शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

मोबाईलमुळे छायाचित्रकरांचा व्यवसाय डबघाईस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 23:43 IST

सतीश जमदाडे ।आॅनलाईन लोकमतआवाळपूर : पूर्वी छायाचित्रकाराने फोटो काढल्यानंतर चार-पाच दिवसानंतर तो हातात येई. यादरम्यान फोटो काढणाऱ्यांची उत्सुकता शिगेला पोहचली असायची. आता आधुनिक जगात तंत्रज्ञानाने झपाट्याने प्रगती केली. हातात सुसज्ज कॅमेरा असलेला मोबाईल आला. यामुळे छायाचित्रकरांचा व्यवसाय मात्र डबघाईस आला आहे.यामुळे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा तरी कसा, असा प्रश्न फोटोग्राफर ...

ठळक मुद्देउदरनिर्वाहाचा प्रश्न : कार्यक्रमांमध्ये मोबाईलचीच क्रेझ

सतीश जमदाडे ।आॅनलाईन लोकमतआवाळपूर : पूर्वी छायाचित्रकाराने फोटो काढल्यानंतर चार-पाच दिवसानंतर तो हातात येई. यादरम्यान फोटो काढणाऱ्यांची उत्सुकता शिगेला पोहचली असायची. आता आधुनिक जगात तंत्रज्ञानाने झपाट्याने प्रगती केली. हातात सुसज्ज कॅमेरा असलेला मोबाईल आला. यामुळे छायाचित्रकरांचा व्यवसाय मात्र डबघाईस आला आहे.यामुळे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा तरी कसा, असा प्रश्न फोटोग्राफर व्यावसायिकाला भेडसावत आहे. पूर्वी प्रत्येक कार्यक्रमात छायाचित्र टीपण्यासाठी फोटोग्राफरची आवश्यकता भासायची. त्याला या कामाची खास आर्डर दिली जायची. याशिवाय कुटुंबांचे फोटो, घरात लहान बाळ आले की त्याचे फोटो स्टुडीओत जाऊन काढले जात होते. परंतु आता फोटोग्राफरच्या कॅमेऱ्याची जागा स्मार्ट फोनने घेतली आहे. आता अनेक कार्यक्रमात फोटोग्राफरला तर बोलाविलेही जात नाही. मोबाईल फोननेच काम भागविले जाते.अत्याधुनिक स्मार्टफोनमधील वेगवेगळ्या फिचर्समुळे डिजिटल कॅमेऱ्याप्रमाणे मोबाईल फोटोग्राफीला गुणवत्ता मिळत आहे. फोटो अ‍ॅप्सच्या सहाय्याने हवे असेल तसे छायाचित्रे टिपता येतात. एक फोन फायदे अनेक असल्यामुळे स्मार्ट फोनची क्रेझ वाढली आहे. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या फोटोग्राफीला हळूहळू लोक विसरत असल्याचे दिसून येत आहे.डिजिटल कॅमेऱ्याची किंमत अधिकडिजिटल कॅमेरा फोटोग्राफी योग्य आणि दर्जेदार फोटोसाठी ओळखला जातो. मात्र मोबाईल फोनच्या तुलनेत डिजिटल कॅमेरा अधिक महाग असल्याने नागरिक मोबाईल फोनलाच अधिक पसंती देत असल्याचे दिसून येत आहे.ग्रामीण भागातही सारखीच स्थितीमोबाईलमधील नवनवीन शोध आणि स्मार्ट फोनचा वाढता वापर, यामुळे व्यावसायिक स्टुडीओतील गर्दी कमी होऊ लागली आहे. शहरी भागानंतर ग्रामीण भागातही स्मार्ट फोन प्रत्येकाच्या हातात पोहचला आहे. पूर्वी गावखेड्यातील कार्यक्रमात शहरातून खास फोटोग्राफर बोलावला जायचा. मात्र आता खेडोपाडी फोटोसाठी मोबाईलचाच वापर केला जाताना दिसून येत आहे.केवळ लग्नसराईतच मागणीव्यावसायिक फोटोग्राफरला प्रत्येक कार्यक्रमात बोलविले जात नसले तरी लग्नसराईतून फोटोग्राफर अद्याप बाद झालेला नाही. लग्नसराईत मोबाईलवर काम भागविले जात नाही. तिथे मात्र फोटोग्राफरला आवर्जुन बोलाविले जाते. त्यामुळे लग्नसराईची या व्यावसायिकांना आतूरतेने प्रतीक्षा असते.मोबाईलच्या युगात मोजक्या कार्यक्रमाला आम्हाला बोलावणं असते. इतरवेळी मोबाईल काम करीत असते. केवळ लग्नसराईत व्यवसाय चालतो. इतर वेळेस हाताला काम नसते. त्यामुळे दुकान थाटून बसणे आता परवडण्यासारखे राहिले नाही.- राजू मोहितकर,फोटोग्राफर, नांदा