शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

टक्का वाढला, बाजी मुलींचीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2021 05:00 IST

कोरोनाची दुसरी लाट उसळल्याने राज्य सरकारने बारावीच्या परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापनाची नवी पद्धत स्वीकारली होती.  परीक्षाच होणार नसल्याने राज्य मंडळातर्फे  विद्यार्थ्यांचे आसन क्रमांक  नोंदविण्याच्या सूचना उच्च माध्यमिक शाळांना देण्यात आल्या.  उच्च माध्यमिक शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना त्यांचे बैठक क्रमांक अवगत करून दिले. शाळांनी विद्यार्थ्यांच्या बैठक क्रमांकाची माहिती राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड केली.

ठळक मुद्देबारावी निकाल ९९.८२ टक्केपरीक्षाविना अंतर्गत मूल्यमापनाद्वारे गुणदान४४ विद्यार्थी नापासबल्लारपूर, गोंडपिपरी, सावली तालुक्याचा निकाल १०० टक्के

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या अंतर्गत मूल्यमापनाद्वारे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ९९.८२ टक्के लागला आहे. या परीक्षेसाठी विज्ञान, कला, वाणिज्य व व्होकेशनल या शाखांतील एकूण २४ हजार ७८१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २४ हजार ७३७ विद्यार्थी उत्तीर्ण, तर ४४ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. कोरोनामुळे यंदा परीक्षाच झाल्या नाहीत. विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनानुसार गुण देण्यात आले. यंदाही टक्केवारीत मुलींनीच बाजी मारली आहे.कोरोनाची दुसरी लाट उसळल्याने राज्य सरकारने बारावीच्या परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापनाची नवी पद्धत स्वीकारली होती. परीक्षाच होणार नसल्याने राज्य मंडळातर्फे  विद्यार्थ्यांचे आसन क्रमांक  नोंदविण्याच्या सूचना उच्च माध्यमिक शाळांना देण्यात आल्या.  उच्च माध्यमिक शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना त्यांचे बैठक क्रमांक अवगत करून दिले. शाळांनी विद्यार्थ्यांच्या बैठक क्रमांकाची माहिती राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड केली.  त्या आधारावरच अंतर्गत मूल्यांकन करून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. 

‘त्या’ विद्यार्थ्यांना   देणार पुन्हा संधी२ जुलै २०२१ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार २०२१ मधील बारावी परीक्षेला श्रेणीसुधार योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आला नाही. या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दोन संधींमध्ये या परीक्षेची गणना केली जाणार नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना राज्य मंडळाकडून पुढील एक-दोन संधी देण्यात येणार आहे. 

असे झाले विद्यार्थ्यांचे मूल्यमापन बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन ३०: ३० : ४० फॉर्म्युल्यानुसार जाहीर झाले. दहावीचे ३० टक्के गुण, अकरावीचे ३० टक्के व बारावीच्या वर्षभरातील परीक्षांचे ४० टक्के गुण या आधारावर अंतिम निकाल घोषित झाला आहे. ११ वीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण (३० टक्के), १२ वी अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या व तत्सम मूल्यमापन गुण (३० टक्के), दहावीच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या ३ विषयांचे सरासरी गुण (३० टक्के) असे यंदाच्या बारावी परीक्षेच्या मूल्यमापनाचे स्वरूप होते.

विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदविता येणार

अंतर्गत मूल्यमापन निकालाबाबत विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी विभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. टपाल, ई-मेल किंवा व्यक्तिश: तक्रार नोंदविता येईल. अर्जाचा नमुना व तक्रारींच्या निरसनासाठी अधिकाऱ्यांची नावे, संपर्क क्रमांक, ई-मेल पत्ता आदी माहिती मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तक्रारीचा अर्ज केल्यानंतर दहा दिवसांत कार्यवाही करणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांनी आपले आक्षेप नोंदवावे, असे आवाहन जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाने दिली आहे. 

 

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकाल