शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

स्वच्छता अभियानात वाढला लोकसहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 22:17 IST

बल्लारपूर नगर परिषदेने स्वच्छता अभियानात सर्वेक्षण २०१९ स्पर्धेत सहभाग घेत शहराच्या स्वच्छतेवर भर दिला. विविध उपक्रम राबविले. शहराला पुरस्कार मिळाला नाही. परंतु, स्वच्छता अभियानात लोकसहभाग वाढून लोकोपयोगी संस्काराची शिकवण मिळाली आहे.

ठळक मुद्देशहराचा चेहरा बदलला : किल्ला स्वच्छता, गणपती घाटाचेही सौंदर्यीकरण

वसंत खेडेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : बल्लारपूर नगर परिषदेने स्वच्छता अभियानात सर्वेक्षण २०१९ स्पर्धेत सहभाग घेत शहराच्या स्वच्छतेवर भर दिला. विविध उपक्रम राबविले. शहराला पुरस्कार मिळाला नाही. परंतु, स्वच्छता अभियानात लोकसहभाग वाढून लोकोपयोगी संस्काराची शिकवण मिळाली आहे.स्पर्धा कोणतीही असो त्या विजेते चार - पाच जण ठरतात. पण, स्पर्धेत उतरणाऱ्या सर्वांना स्पर्धेतील विषयाचा अभ्यास करावा लागतो. स्पर्धेत पुरस्कार मिळाला तरी त्यातील अनुभवाचा पुढे फायदा होतो. स्वच्छता सर्वेक्षण २०१९ स्पर्धेबाबत नेमके हेच झाले आहे. नगर परिषदच्या स्वच्छता जनजागरण कार्यक्रमातून प्रोत्साहन मिळाल्याने लोकांचे लक्ष स्वच्छतेकडे वळले. प्रत्येकाने आपल्या घरासोबतच परिसर स्वच्छ राहावा, याकरिता प्रयत्न सुरू केल्याचे दिसून आले. नागरिकांच्या मनात घाणीविषयी चीड निर्माण झाली. स्वच्छता अभियानात गाव स्वच्छ झाले. स्वच्छतेबाबत लोकांच्या मनात जागरूकता आली. या अभियानात ऐतिहासिक गोंडकालिन किल्ल्यांची स्वच्छता झाली. गणपती घाटाचे सौंदर्यीकरण केल्याने मन प्रसन्न होते. किल्ला परिसरात दरवर्षी हिरवा कचरा उगवायचा. उन्हाळा हिवाळ्यात हा कचरा सर्वत्र पसरतो. काही ठिकाणी झाडे उगवली. त्यामुळे किल्ल्यातील बराचसा दर्शनीय भाग झाकोळला गेला होता. किल्ल्यातील विहिरीत वृक्षांनी घर केले होते. हे दृष्य आता बदलत आहे. नागरिक पुढे येत असल्याने शहरातील दुर्लक्षित प्रभागातही स्वच्छतेचा संदेश पोहोचू लागला आहे.ऐतिहासिक किल्ल्यांचे वाढणार महत्त्वनदी काठावरील राणी महाल ऐतिहासिक आहे. परंतु, स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याची खंत इतिहासपे्रमी व्यक्त करत होते. नगर परिषदने स्वच्छता अभियानादरम्यान किल्ला स्वच्छते काम हाती घेतले. लोकसहभागातून सुमारे अडीच महिने राबून किल्ल्याला कचऱ्यापासून मुक्त केले. किल्ला परिसरात उगवलेली झाडे तोडली. स्वच्छते काम अव्याहतपणे सुरू आहे.घाट नव्हे सहलस्थळ !अभियानात गणपती घाटाची स्वच्छता झाली. हे घाट आता सहल स्थळ म्हणून विकसीत झाले आहे. शहरातील घरोघरी शौचालय तयार झाले. यावर्षी पुस्काराने हुलकावणी दिली. परंतु नागरिकांच्या चुकीच्या सवयी बदलल्या.