शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

विसापूर रेल्वे फाटकाच्या बंदमुळे नागरिक वैतागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 00:51 IST

विसापूर गाव बल्लारपूर तालुक्यात सर्वात मोठे आहे. रेल्वेच्या तीन लाईनमुळे १५ हजारांवर लोकवस्तीचे गाव विभागले आहे. गावाच्या मध्यभागातून चौथी रेल्वे लाईन होवू घातली आहे. दळणवळणाची सुविधा म्हणून रेल्वे फाटकाजवळून भुयारी मार्ग तयार करण्यात आला.

ठळक मुद्देमध्य रेल्वे प्रशासनाची मुजोरी : भुयारी मार्गात दिवाबत्तीची सुविधाही नाही, अनुचित घटना घडण्याची शक्यता

अनकेश्वर मेश्राम ।लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : विसापूर गाव बल्लारपूर तालुक्यात सर्वात मोठे आहे. रेल्वेच्या तीन लाईनमुळे १५ हजारांवर लोकवस्तीचे गाव विभागले आहे. गावाच्या मध्यभागातून चौथी रेल्वे लाईन होवू घातली आहे. दळणवळणाची सुविधा म्हणून रेल्वे फाटकाजवळून भुयारी मार्ग तयार करण्यात आला. मात्र मध्य रेल्वे प्रशासनाने मार्गावर दिवाबत्तीची सुविधा न करता ४५ एसपीएल क्रमांकाचे रेल्वे फाटक बुधवारपासून कायमचे बंद केले. परिणामी गावकऱ्यांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. यामुळे नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गावातील तीनही रेल्वे लाईनवरून दररोज १५० वर रेल्वे गाड्याचे आवागमन होते. यामुळे मध्ये रेल्वे विभागाचे ४५ एसपीएल क्रमांकाचे रेल्वेफाटक वाहन चालकांना त्रासदायक ठरले होते. यावर उपाययोजना म्हणून भुयारी मार्ग तयार करण्यात आला. वाहन चालकांना सदरचा मार्ग उपयुक्त आहे. परंतु पादचाऱ्यांना अनेक संकट आणणारा ठरला आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने भुयारी मार्गाची किमान वर्षभर चाचणी घेवून ४५ एसपीएल क्रमांकाचे रेल्वे फाअक कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेणे क्रमप्राप्त होते. मात्र मग्रुर मध्य रेल्वे प्रशासनाचे तुघलकी निर्णय घेवून येथील नागरिकांना वेठीस धरले आहे.येथील ग्रामपंचायत प्रशसनाने नागपूर मध्य रेल्वे विभागाकडे नागरिकांना ये - जा करण्यासाठी पादचारी पुलाचे बांधकाम करावे, भुयारी मार्गादरम्यान दिवाबत्तीची व्यवस्था करावी व पावसाळ्यात भुयारी मार्ग बंद राहण्याची सर्वाधिक शक्यता असल्याने रेल्वे फाटक बंद करण्यात येवू नये, म्हणून पत्रव्यवहार केल्याची माहिती आहे. मात्र मध्य रेल्वे विभागाने ग्रामपंचायतीच्या पत्राला केराची टोपली दाखवित मुजारीने ४५ एसपीएल क्रमांकाचे रेल्वे फाटक कायम बंद केले. याबाबत नागपूर विभागाचे मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक श्रीवास्तव यांच्याशी संपर्क केला असता उत्तरदेखील देण्याचे टाळले. यामुळे गावकºयात तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, भुयारी मार्ग दिवसरात्र वर्दळीचा आहे. भुयारी मार्गादरम्यान दिवाबत्तीची सुविधा नसल्याने असामाजिक तत्वाच्या लोकांकडून अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. रात्रीच्या वेळी व दिवसादेखील एकही महिला जावू शकत नाही. पादचाºयांना भुयारी मार्गातून आवागमन करताना जिवावर बेतणारे ठरू शकते. एखादी अनुचित घटना घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिकांनी केला आहे. 

टॅग्स :railwayरेल्वे