शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सुधीर मुनगंटीवार शब्द पाळणारे लोकनेते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 00:53 IST

विकासासंबंधी आजवर जो शब्द ना. सुधीर मुनगंटीवार यांनी जनतेला दिला तो प्राधान्याने पूर्ण केला आहे. म्हणूनच शब्दाला जागणारा नेता अशी त्यांची राज्यभर ख्याती आहे. बल्लारपूर तालुक्यातील मानोरा येथे विशेष बाब या सदराखाली प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्याचा निर्णय त्यांच्या पुढाकाराने घेण्यात आला.

ठळक मुद्देचंदनसिंह चंदेल : मानोरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विकासासंबंधी आजवर जो शब्द ना. सुधीर मुनगंटीवार यांनी जनतेला दिला तो प्राधान्याने पूर्ण केला आहे. म्हणूनच शब्दाला जागणारा नेता अशी त्यांची राज्यभर ख्याती आहे. बल्लारपूर तालुक्यातील मानोरा येथे विशेष बाब या सदराखाली प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्याचा निर्णय त्यांच्या पुढाकाराने घेण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यात आरोग्य सेवा बळकट करण्याच्या दृष्टीने नेहमीच त्यांनी पुढाकार घेतला असुन रूग्णसेवा हीच ईश्वराची सेवा आहे, असे समजून कार्य करणाºया ना. मुनगंटीवार यांचा आम्हाला अभिमान असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांनी केले.बल्लारपूर तालुक्यातील मानोरा गावात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमीपूजन कार्यक्रमात चंदनसिंह चंदेल बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बल्लारपूर पंचायत समितीचे सभापती गोविंद पोडे तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे तालुकाध्यक्ष किशोर पंदिलवार, सरचिटणीस रमेश पिपरे, बल्लारपूर पंचायत समितीचे माजी सभापती राजू बुध्दलवार, जिल्हा परिषद सदस्या वैशाली बुध्दलवार, हरीश गेडाम, पंचायत समिती च्या उपसभापती इंदिरा पिपरे, पंचायत समिती सदस्य सोमेश्वर पदमगिरीवार, विद्या गेडाम, इटोलीच्या सरपंच मंगला सातपुते आदी उपस्थित होते.चंदेल पुढे म्हणाले, ना. सुधीर मुनगंटीवार यांनी मानोरा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्याबाबत नागरिकांना शब्द दिला होता. तो शब्द त्यांनी पूर्ण केला आहे. त्यांनी आरोग्य सेवेच्या बळकटीसाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. सुमारे ५०० हून अधिक दिव्यांग बांधवांना तीन चाकी सायकलींचे वितरण, ३५ हजार नागरिकांना चश्मे वितरण, पाच हजार नेत्ररूग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया यासह नुकतीच लाईफ लाईन एक्सप्रेस या उपक्रमाच्या माध्यमातून रोगनिदान, उपचार व नि:शुल्क शस्त्रक्रिया त्यांनी करविल्या. टाटा ट्रस्टच्या सहाय्याने चंद्रपूर जिल्ह्यात कॅन्सर रूग्णालय उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णय नुकत्याच त्यांच्या पुढाकाराने घेण्यात आला आहे. हे कॅन्सर रूग्णालय वर्षभरात उभारण्यात येणार आहे. नेहमी तत्पर राहून नागरिकांना दिलासा देणारा हा नेता खऱ्या अर्थाने लोकनेता आहे, असे ते म्हणाले, यावेळी वैशाली बुध्दलवार, हरीश गेडाम, गोविंद पोडे आदींची भाषणे झालीत. कार्यक्रमाचे संचालन रमेश पिपरे यांनी केले.