शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

तपोभूमीतील नागरिकांनी केले गावात श्रमदान

By admin | Updated: November 8, 2014 01:04 IST

‘एक तरी हात खोदावी जमीन, तेची पुजनाहुनी पूजन’ असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी म्हटले आहे.

पेंढरी (कोके) : ‘एक तरी हात खोदावी जमीन, तेची पुजनाहुनी पूजन’ असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी म्हटले आहे. याच धर्तीवर राष्ट्रसंताच्या पुण्यतिथी पर्वावर गावकऱ्यांनी तपोभूमीत श्रमदान करुन राष्ट्रसंताला आदरांजली अर्पण केली. दानात दान रक्तदान, तसेच दानात दान श्रमदान हेही घोषवाक्य आता पुढे येऊ लागले आहे. प्रा. नीळकंंठ लोनबले यांच्या संंकल्पनेतून सरपंच विष्णुदास मगरे, नामदेवराव घोडाम, संजय धारणे, चंद्रभान बारेकर, विजय श्रीरामे, गुलाम घोडाम, रमेश गायकवाड आदींंच्या परिश्रमातून राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथी पर्वाचे औचित्य साधून तपोभूमीत श्रमदान केले. त्यापूर्वी तीन दिवस राष्ट्रसंतांचा पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यात आला. यात सामुदायिक ध्यान, साधना, प्रार्थना, रामधून, स्वच्छता, रांगोळी स्पर्धा, सायकल स्पर्धा, भजन, कीर्तन असे उपक्रम साजरे करण्यात आले. यात विठ्ठलराव वाढई, सुधाकर चौधरी, हरीजी मेश्राम, दौलत घरत, रघुनाथ धारणे, मोरेश्वर सोनुले, भाऊराव वाढई, रुपचंद धारणे, इतर गावकरी व आश्रमशाळेचे विद्यार्थी- कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. (वार्ताहर)तीर्थक्षेत्र गोंदेडाचा विकास कराराष्ट्रसंताची तपोभूमी गोंदेडा ‘क’ तीर्थक्षेत्र म्हणून जेव्हापासून घोषित झाली. तेव्हापासून ती विकासापासून अजूनपर्यंत उपेक्षित आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी बालपणी चिमूर तालुक्यातील गोंदेडा येथे तपश्चर्या केली. तेव्हापासून या साधनाभूमीला ‘तपोभूमी’ म्हणून संबोधतात. मागील तीन वर्षा अगोदर या तपोभूमीला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला. समतेचा संदेश देणाऱ्या तीर्थक्षेत्रात सर्व जाती-धर्माचे लोक दर्शनासाठी येतात. पर्यटन वा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता, पथदिवे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुलभ शौचालय, यात्री निवास, सौंदर्यीकरण व पार्किंग आदी सुविधासाठी शासन दरवर्षी चार ते पाच कोटीचा निधी उपलब्ध करून देतो. त्यासाठी संबंधित तहसीलदारांनी सदर तीर्थस्थळावर एक वर्षात एक लाखाहून अधिक भाविक दर्शनासाठी किंवा यात्रा स्थळाची शिफारस जिल्हा प्रशासनाकडे करावी लागते. गोंदेडा तीर्थस्थळावर दरवर्षी पौष पोर्णिमेला यात्रा भरते. त्या यात्रेला लाखो भाविक उपस्थित राहतात व वर्षभर धरुन दीड लाखाच्यावर भाविक येथे दर्शनासाठी येतात. परंतु हे तीर्थक्षेत्र लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे अजुनही विकासापासून कोसोदूर आहे. नवीन सरकारने या क्षेत्राचा विकास करावा, अशी मागणी परिसरातील गुरुदेव भक्तांनी केली आहे.