शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पेंढरी(मक्ता) शिवारातून अवैध मुरुम उत्खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 23:21 IST

पेंढरी मक्ताअंतर्गत पांढरसराड चक येथे शेतजमिनीतून पडिक जमीन सुपिक करुन देतो, असे आमिष दाखवून मुरुमाचे अवैध उत्खनन सुरू आहे.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : चौकशीची मागणी

आॅनलाईन लोकमतसावली : पेंढरी मक्ताअंतर्गत पांढरसराड चक येथे शेतजमिनीतून पडिक जमीन सुपिक करुन देतो, असे आमिष दाखवून मुरुमाचे अवैध उत्खनन सुरू आहे. मात्र, संबंधित विभागाने या घटनेकडे दुर्लक्ष केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.पेंढरी मक्ता साजा क्रं. ९, (तलाठी साजा) अंतर्गत पांढरसराड चक येथील सर्व्हे क्रमांक ७१/१, ७१/२, ७१/३ सुखदेव, काशिनाथ, यशवंत झिंगू गेडाम यांच्या मालकीची शेतजमीन आहे. शेतजमिनीपैकी काही जमीन पडिक आहे. उर्वरीत शेतजमिनीत धानाचे पीक घेतले जाते. सदर शेत जमीन ही जंगल परिसराला लागून आहे. मागील काही दिवसांपासून राष्टÑीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. दरम्यान, पिकासाठी जमीन सुपिक करुन देतो, असे आश्वासन देवून कंत्राटदाराने उत्खनन सुरु केले. उत्खनासाठी पोकलॅड यंत्राचा वापर करुन जमिनीतून वृक्षांची कत्तल केली जात आहे.एक महिन्यापासून मुरुम उत्खनन सुरू असल्याने आतापर्यंत हजारो ब्रॉसचा महसूल बुडाल्याची शंका व्यक्त केली जात आहे.उत्खननामुळे पडिक जमीन समांतर न करता जमिनीचा पोत खराब करण्याचा प्रकार सुरू असल्याचे दिसून येते. सदर काम ग्रामपंचायत पेंढरी मक्ताअंतर्गत गट ग्रामपंचायत पांढरसरांड चक हद्दीतील असतानाही उत्खननाबाबत ग्रा.पं.मध्ये ठराव घेण्यात आला नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे. मुरुमाच्या उत्खनामुळे तालुक्यातील नैसर्गिक डोंगरांचा ºहास झाला. वनाचे संरक्षण व संवर्धन व्हावे, यासाठी अनेक योजना सुरू असताना वृक्षांचे नुकसान केले जात आहे. उत्खननाच्या माध्यमातून झाडांची कत्तल करताना संबंधित विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. यासंदर्भात संबंधित तालुकास्तरीय अधिकारी उघडपणे बोलायला तयार नाहीत.लाखोंचा महसूल बुडालातालुक्यातील अनेक गावांत शासकीय जमीन तसेच शेतातही अवैध उत्खनन सुरू आहे. मात्र, संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी मौन पाळल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. गतवर्षीदेखील अवैध उत्खननामुळे शासनाचे नुकसान झाले होते. खासगी जमिनीतील उत्खनासंदर्भातही राज्य सरकारने नियम तयार केले आहे. परंतु, अधिकाºयांकडून नियमांचे पालन होत नाही.