शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

महिला लैंगिक छळ तक्रार समिती गठीत न केल्यास 50 हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 05:00 IST

अपर जिल्हाधिकारी वरखेडकर म्हणाल्या, नियमानुसार दर तीन वर्षांनी समितीचे पुनर्गठन होणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी सदर समित्यांचे गठन झाले नाही, अशा आस्थापनांचा आढावा घ्या. कार्यालयातील समितीचे सदस्य सेवानिवृत्त किंवा इतर ठिकाणी बदली झाले असतील, तर अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. अंतर्गत तक्रार समितीच्या वार्षिक अहवालाचे नमुने सर्वांना पाठवून कार्यालयाकडून प्राप्त करावे, अशाही सूचना वरखेडकर यांनी सूचना केल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कामाच्या ठिकाणी महिला लैंगिक छळाच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी १० किंवा त्यापेक्षा अधिकारी अधिकारी-कर्मचारी असणाऱ्या प्रत्येक कार्यालयांतर्गत तक्रार समिती गठित केली नाही, तर त्या आस्थापनेवर ५० हजारांचा दंड ठोठावण्यात येईल, अशा कार्यालयांची तक्रार जिल्हा समितीकडे करता येऊ शकते, अशी माहिती अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी बुधवारी आढावा बैठकीत दिली.यावेळी पोलीस उपअधीक्षक शेखर देशमुख, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त भय्याजी येरमे, पाटबंधारे विभागाचे सहायक अधीक्षक अभियंता कांबळे, महिला व बालविकास अधिकारी रमेश टेटे, मनपाच्या सहायक आयुक्त विद्या पाटील, अग्रणी बँक जिल्हा प्रबंधक प्रशांत धोंगळे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) दीपेंद्र लोखंडे, शिक्षणाधिकारी (माध्य.) उल्हास नरड व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. अपर जिल्हाधिकारी वरखेडकर म्हणाल्या, नियमानुसार दर तीन वर्षांनी समितीचे पुनर्गठन होणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी सदर समित्यांचे गठन झाले नाही, अशा आस्थापनांचा आढावा घ्या. कार्यालयातील समितीचे सदस्य सेवानिवृत्त किंवा इतर ठिकाणी बदली झाले असतील, तर अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. अंतर्गत तक्रार समितीच्या वार्षिक अहवालाचे नमुने सर्वांना पाठवून कार्यालयाकडून प्राप्त करावे, अशाही सूचना वरखेडकर यांनी सूचना केल्या.अशी असावी समिती- ज्या आस्थापनांमध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असते. तिथे या समितीबाबत महिलांमध्ये जनजागृती करावी. - ऑनलाईन प्रशिक्षण घ्यावे. समितीचा फलक कार्यालयाच्या दर्शनी भागात लावून त्यात सदस्यांची नावे व मोबाईल क्रमांक नमूद करावा. - या समितीत चार जणांचा समावेश असला पाहिजे.

 

टॅग्स :Policeपोलिस