शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील मनरेगा कामगारांची प्रलंबित मजुरी तत्काळ द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 13:48 IST

सुधीर मुनगंटीवार : केंद्रीय ग्रामीण विकासमंत्र्यांनी साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : मनरेगा अंतर्गत रोजगार हमी योजनेअंतर्गत  जिल्ह्यातील मजुरांची मजुरी काही महिन्यांपासून शासनाकडे प्रलंबित आहे. त्यामुळे कामगार हक्काच्या मजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न असून अधिकाऱ्यांनी दखल घेऊन मजुरी तातडीने देण्याचे निर्देश राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीत दिला. केंद्रीयमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून केंद्राशी संबंधित मजुरांची प्रलंबित मजुरी तात्काळ देण्याची विनंतीही त्यांनी केली. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील आयोजित महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या आढावा बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, उपजिल्हाधिकारी (रो. ह.यो) शुभम दांडेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (मनरेगा) फरेंद्र कुतीरकर, विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे व विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले, मजुरांना सात दिवसात मजूरी देण्याचा कायदा आहे. कष्टकरी गरीब कामगारांची मजुरी वेळेत देण्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्यात. काही महिन्यांपासून मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांची मजुरी ही शासन स्तरावर प्रलंबित असल्यामुळे पालकमंत्री मुनगंटीवार यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून कामगारांच्या मजुरीचा निधी तात्काळ उपलब्ध करून देण्याची विनंती केली.

बचतगट भवनाचे मॉडेल डिझाईन करा महिलांच्या प्रभाग संघासाठी बचतगट भवन उभारण्याचे नियोजन असून बचत गट उभारताना स्वच्छतागृह, हिरकणी कक्ष, सोलर व्यवस्था, वॉल कंपाऊंड, पेव्हींग ब्लॉक, बसण्यासार्टी खुर्थ्यांची व्यवस्था, भिंतीवर स्लोगन्स, विद्युत व्यवस्था, परिसर सौंदर्याकरण व महिलांचे उत्पादन विक्रीकरिता दुकान आदी व्यवस्था कराव्यात, अशीही सूचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर