शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारशाहतून नवीन रेल्वे सुरू होण्याचा मार्ग मोकळा; ३ जुलै रोजी होणार चाचणी

By साईनाथ कुचनकार | Updated: June 28, 2023 15:44 IST

रेल्वे स्थानकावरील पिटलाइनचे का पूर्ण 

चंद्रपूर : मागील चार वर्षांपासून बांधकाम सुरू असलेल्या बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील पिटलाइनचे काम आता जवळपास पूर्ण झाले आहे. येत्या ३ जुलै रोजी संबंधित अधिकाऱ्यांकडून त्याची चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानंतर ही पिटलाइन रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतरित होताच या स्थानकातून विविध रेल्वे गाड्या सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून लांब पल्ल्याच्या रेल्वेच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

७ मार्च २०१९ रोजी ओबीसी आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी पुढाकार घेत शासनाकडून ११.१५ रुपये मंजूर करून २६ बोगींच्या पिटलाइनच्या कामाचा शुभारंभ केला होता. दरम्यानच्या काळात कोरोना संकटामुळे या कामाला विलंब झाला. कामाच्या विलंबामुळे माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, झेडआरयूसीसी सदस्य दामोदर मंत्री, श्रीनिवास सुंचूवार, डीआरयूसीसी सदस्य विकास राजूरकर यांनी वेळोवेळी पिटलाइनच्या कामाची पाहणी करून संबंधितांना काम त्वरित करण्यासंदर्भात सूचना दिल्या. सततचा पत्रव्यवहार आणि प्रयत्नांमुळे अखेर पिटलाइनचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. या कामाची एमएनटीद्वारे चाचणी होणार आहे. यासाठी ३ जुलै रोजी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

पिटलाइन सुरू होताच येथून मुंबईसाठी थेट रेल्वेही लवकरच सुरू होईल, अशी आशा झेडआरयूसीसी सदस्य दामोदर मंत्री, श्रीनिवास सुंचूवार, डीआरयूसीसी सदस्य विकास राजूरकर यांनी व्यक्त केली.

मध्य भारतातील महत्त्वाचे स्टेशन

बल्लारशाह रेल्वे स्टेशन हे मध्य भारतातील एक प्रमुख रेल्वे जंक्शन आहे. या रेल्वे स्थानकावर मध्य रेल्वे, दक्षिण मध्य रेल्वे, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे झोनचा त्रिवेणी संगम आहे. या स्थानकातून चंद्रपूर, गडचिरोली, तेलंगणा सीमावर्ती भागातील प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता येथे पिटलाइन सुरू करण्यात येणार आहे.

बल्लारशा रेल्वे स्थानकावर पिटलाइन सुरू करण्यासंदर्भात रेल्वे प्रशासनाकडे मागील अनेक वर्षांपासून पत्रव्यवहार सुरू होता. दरम्यान, कोरोना संकट काळानंतर येथून थेट मुंबईला जाणारी सेवाग्राम ही एकमेव ट्रेनही बंद करण्यात आली. परिणामी, प्रवाशांना मुंबईला जाणे तसेच मुंबई येथून चंद्रपूरला येणे कठीण झाले आहे. या पिटलाइनचे काम आता पूर्ण झाले असून, लवकरच येथून नवीन रेल्वे सुरू होतील, अशी आशा आहे.

- श्रीनिवास सुंचूवार, झेडआरयूसीसी सदस्य, मध्य रेल्वे

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेballarpur-acबल्लारपूरchandrapur-acचंद्रपूर