शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘एका बाकावर एक विद्यार्थी‘ अटीने शाळांसमोर पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2021 05:00 IST

 जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार शाळा समितीने शाळा सुरू करण्यापूर्वी दिलेल्या बाबींवर चर्चा करणे आवश्यक आहे. समितीने शाळा सुरू करण्यापूर्वी संबंधित शहरात, गावात कोविडचा प्रादुर्भाव कमी झालेला असावा. सर्व शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वच शाळांच्या इयत्ता १ ते ४ व शहरी भागात १ ते ७ वीचे वर्ग  सुरू करण्यास परवानगी मिळाली.  मात्र, वर्गात एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे बैठक व्यवस्था असावी, असे मार्गदर्शक तत्त्वात नमूद केल्याने गुरुवारी शाळांचा दुसरा दिवस गोंधळात गेला. याच गोंधळामुळे काही शाळांमध्ये तासिकाच झाल्या नसल्याचे समजते. जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार शाळा समितीने शाळा सुरू करण्यापूर्वी दिलेल्या बाबींवर चर्चा करणे आवश्यक आहे. समितीने शाळा सुरू करण्यापूर्वी संबंधित शहरात, गावात कोविडचा प्रादुर्भाव कमी झालेला असावा. सर्व शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये. कोविडसंबंधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, जास्त विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रांमध्ये, एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये सहा फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त १५ ते २० विद्यार्थी, सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर, लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना वैद्यकीय अधिकारी अथवा नजीकच्या आरोग्य केंद्रांमध्ये पाठवावे. विद्यार्थी कोविडग्रस्त झाल्याचे आढळल्यास शाळा बंद करून शाळा निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना केल्या आहेत.

मुख्याध्यापक संभ्रमात- शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोविडसाठीची ४८ तासांपूर्वीची आरटीपीसीआर चाचणी करावी. प्रयोगशाळेने दिलेले प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापनास सादर करावे. - शाळा सुरू केल्यानंतर मुलांना टप्पाटप्प्यांत वर्गात बोलविण्याच्या सूचना गुरुवारी जारी केल्या. शुक्रवारी पहिल्या दिवशी सरसकट सर्वच मुलांना वर्गात बोलाविले होते. - नवीन सूचनेमुळे मुख्याध्यापक संभ्रमात सापडले आहेत.

 शाळा समिती व पालकांची भूमिका महत्त्वाची  विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी पालकांची संमती आवश्यक असेल. जि. प. शाळांनी याबाबत शाळा व्यवस्थापन समितीने पालकांशी चर्चा करावी, असेही सुचविण्यात आले. शुक्रवारी बऱ्याच शाळांनी समितीची चर्चा करून शाळा सुरू केली होती. मात्र, पहिल्या दिवशी जिल्हास्तरावरील मार्गदर्शक सूचना जारी झाले नव्हते. आज प्रशासनाने याबाबत सूचित केले. त्यामुळे स्थानिक स्थिती लक्षात घेऊन आदेशापर्यंत वर्ग सुरू ठेवण्यास शाळा समिती व पालकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळा