लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शाळेमध्ये जाणारी आपली मुले कोणत्या वाहनातून प्रवास करतात. या वाहनाचे चालक प्रशिक्षित आहे अथवा नाही, शाळा या वाहन चालकांबाबत कोणती काळजी घेते यासंदभार्तील चौकशी आपल्या पाल्याच्या अभ्यासाइतकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे स्कूलबस व अन्य वाहनांबाबत पालकांनी जागृत रहावे, असे प्रतिपादन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वंभर शिंदे यांनी गुरूवारी केले़ पोलीस मुख्यालयात गुरूवारी घेण्यात आलेल्या पालक मेळाव्यात ते बोलत होते़मेळाव्याला अतिरिक्त पोलीस अधीक्षक हेमराज सिंह राजपूत, शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर उपस्थित होते. चौधरी म्हणाले, आपला पाल्य ज्या शाळेमध्ये शिकतो आहे. त्या शाळेतील वाहन व्यवस्थेबाबत पालकांनी जागरूक असणे अत्यंत आवश्यक आहे. शाळा व्यवस्थापनाने यावर अतिशय लक्ष देणे गरजेचे आहे. प्रत्येक घरातला मुलगा शहरातील शाळांमध्ये जाताना अतिशय सुरक्षितरित्या शाळेमध्ये पोहोचला पाहिजे़ राजपूत म्हणाले, उपप्रादेशिक परिवहन विभागामार्फत शासनाने निर्देशित केलेल्या नियमानुसार वाहनांच्या तपासणीची काळजी घेतली जाते तथापि, शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, पालक आणि अन्य सर्वच घटकांनी याबाबत काळजी घ्यावी़ न्यायालयाच्या आदेशानुसार शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहनातून वाहतूक करण्यासाठी पालकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. या संदर्भात पालक व शाळेसोबत परिवहन समितीचे अधिकारी संवाद कायम ठेवण्याबाबत चर्चा झाली़ शालेय वाहतुकीच्या नियमांचे पालन सर्व घटकांनी करणे आवश्यक असल्याचे मार्गदर्शन करण्यात आले.
वाहनाबाबत पालकांनी जागृत असावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 22:30 IST
शाळेमध्ये जाणारी आपली मुले कोणत्या वाहनातून प्रवास करतात. या वाहनाचे चालक प्रशिक्षित आहे अथवा नाही, शाळा या वाहन चालकांबाबत कोणती काळजी घेते यासंदभार्तील चौकशी आपल्या पाल्याच्या अभ्यासाइतकीच महत्त्वाची आहे.
वाहनाबाबत पालकांनी जागृत असावे
ठळक मुद्देविश्वंभर शिंदे : पोलीस मुख्यालयात पालक मेळावा