ऑनलाईन लोकमतवरोरा : शहरालगत असणाऱ्या मार्डा रोडस्थित पारस ज्नििंगमध्ये गुरुवारी दुपारी ३.३० वाजताच्या दरम्यान अचानक आग लागली. यात अंदाजे २०० क्विंटल कापूस जळून खाक झाला. या आगीमुळे दोन लाखांचे नुकसान झाले असल्याचे मंडळ अधिकारी यांनी सांगितले.शहरापासून जवळच असणाऱ्या मार्डा रोडवरील पारस ज्नििंगमध्ये शॉर्ट सर्कीटमुळे अचानक आग लागली. आग लागल्याचे माहीत होताच कामगारांमध्ये एकच खळबळ उडाली. याची माहिती तेथील संचालक तसेच व्यवस्थापकांना देण्यात आली. त्यांनी वरोरा नगर परिषद व जीएमआरकंपनीमध्ये फोन करून अग्निशामक दलास पाचारण केले. क्षणाचाही विलंब न करता दोन्ही पथक घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळविण्यात त्यांना यश आले. तलाठी, मंडळ अधिकारी यांनी पंचनामा केला.
पारस जिनिंगला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 00:15 IST
शहरालगत असणाऱ्या मार्डा रोडस्थित पारस ज्नििंगमध्ये गुरुवारी दुपारी ३.३० वाजताच्या दरम्यान अचानक आग लागली. यात अंदाजे २०० क्विंटल कापूस जळून खाक झाला.
पारस जिनिंगला आग
ठळक मुद्दे२०० क्विंटल जळाला : दोन लाखांचे नुकसान