कांग्रेसने दिले निवेदन : भाजप सरकार बरखास्त करालोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : कर्जमाफी झालीच पाहिजे, यासाठी आंदोलन करणाऱ्या मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांवर भाजपच्या सरकारने गोळ्या घातल्या. पोलिसांच्या गोळीबारात पाच शेतकरी ठार झाले. या निर्दयी भाजप शासनाचा चिमूर तालुका कांग्रेस कमेटीचे अध्यक्ष माधव बिरजे यांच्या नेतृत्वात निषेध करण्यात आला. प्रभारी तहसीलदारांच्या माध्यमातून राष्ट्रपतींना निवेदन देऊन तेथील भाजप सरकार बरखास्त करण्याची मागणी करण्यात आली. मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यात दौदल येथे शेतकऱ्याचे आंदोलन पेटले. यावेळी पोलिसांशी शेतकऱ्यांची धुमश्चक्री उडाली. पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयींचे सांत्वन करण्यासाठी माजी खासदार मीनाक्षी नटराजन जात असताना पोलिसांनी अटक केली. या पद्धतीच्या हुकूमशाहीचा तीव्र निषेध करीत मध्य प्रदेशातील भाजप सरकार बरखास्त करण्याची मागणी करण्यात आली. शिष्टमंडळात कांग्रेसचे जि.प. गटनेते डॉ. सतीश वारजूकर, तालुका अध्यक्ष माधव बिरजे, नगरसेवक विनोद ढाकुणकर, युवक कांग्रेस विधानसभा उपाध्यक्ष अविनाश अगडे, नप गटनेते अब्दुल कादिर शेख ,विलास मोहिनकर, प्रवीण मोदी , पप्पू शेख, संजय लाखे, अनिल ननावरे आदी उपस्थित होते.
मध्य प्रदेशातील गोळीबाराचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2017 00:54 IST