शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

पेपर मिल कोणत्याही स्थितीत बंद बडू देणार नाही

By admin | Updated: May 9, 2016 00:52 IST

बल्लारपूर स्थित पेपर मिल हे चंद्रपूर जिल्ह्याची अर्थवाहिनी आहे. यामुळे, हा जुना व मोठा उद्योग बंद पडू देणार नाही, ....

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन : समस्या मार्गी लावण्यासाठी लवकरच बैठकबल्लारपूर: बल्लारपूर स्थित पेपर मिल हे चंद्रपूर जिल्ह्याची अर्थवाहिनी आहे. यामुळे, हा जुना व मोठा उद्योग बंद पडू देणार नाही, अशी ग्वाही देत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, या पेपर मिलला लागणारा कच्चा माल सॉफ्ट लाकडू व बांबू मिळविण्यासाठीचा मार्ग लवकरच मोकळा होईल, असे ठोस आश्वासन बल्लारपूर पेपर मिलचे अध्यक्ष, माजी खासदार नरेश पुगलिया यांना दिल्ली येथे महाराष्ट्र सदनात शनिवारी झालेल्या भेटीतील चर्चेत दिले. बांबू तसेच लाकडांच्या तुटवड्यामुळे कच्च्या मालाचा प्रश्न या उद्योगापुढे उभा झाला आहे. त्यापायी हा उद्योग बंद पडल्यास यावर अवलंबून असलेल्या सुमारे १० हजार कुटुंबांवर विपरीत परिणाम पडणार आहे. पुगलिया यांनी या भेटीत हा गंभीर व ज्वलंत प्रश्न मुख्यमंत्र्यासमोर माहिती देत मांडला. ते लक्षपूर्वक ऐकून घेऊन मुख्यमंत्र्यांनी मिल बंद होऊ देणार नाही, असे आश्वासन दिले व या गंभीर समस्येबाबत लवकरात लवकर सभा बोलाविण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिव क्षत्रिय तसेच मुख्यमंत्री यांचे मुख्य सचिव परदेशी यांना दिली.या मिल बाबतचा कच्च्या मालाचा प्रश्न कायमचा मिटावा याकरिता बांबू व सॉफ्ट लाकूड यांच्या लागवडीकरिता वनविभागाची डी ग्रेडेड जमीन पेपर मिलला देण्यात येईल, असेही ते म्हणाले, शासनाने पेपर मिलला, तुटवडा पडणार नाही तेवढा आवश्यक बांबू द्यावा, या मागणीसाठी बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभा आणि विदर्भ किसान मजदूर काँग्रेसने १ मेपासून येथे साखळी उपोषण सुरु केले आहे. या मागणीकरिता १० मे रोजी स्थानिक उपविभागीय अधिकारी कार्यालयावर महिला आणि कामगारांचा मोर्चा नेण्याचे ठरले होते. परंतु, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर हा मोर्चा तूर्त रद्द करण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)बल्लारपूर पेपर मिलला लागणारा कच्चा माल सध्या आसाम, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या प्रांतांमधून आणावा लागत आहे. यामुळे कागद उत्पादन खर्च वाढत आहे व कागदाच्या किंमती वाढवाव्या लागत आहे. दुसरीकडे चीन व इंडोनोशिया या देशातील कागद येथे आयात होत असून त्यांचेवर आयात शुल्क शून्य असल्याने त्यांनी विक्री किंमत कमी आहे. याचा परिणाम देशातील कागद उद्योगाच्या व्यवसायावर होत आहे. यावर उपाय म्हणजे विदेशातून येथे येणाऱ्या कागदावर आयात कर लावावा, अशी मागणी पुगलिया यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली, यावर निश्चित उपाय केला जाणार असे मुख्यमंत्री म्हणाले.मुख्यमंत्र्याच्या या भेटीत पुगलिया यांनी या भागातील जलसमस्याही त्यांचेपुढे मांडली. वर्धा नदी आणि पैनगंगा या नदीकाठी २१ मोठे उद्योग व नगर परिषद आणि ग्रा.पं.च्या नळ योजनांच्या विहिरी आहेत. पाणी साठा भरपूर असावा याकरिता या नद्यांवर धरण बांधणे तसेच निम्न पैनगंगा प्रोजेक्टला मान्यता सरकारने ५० टक्के खर्च उचलून हे प्रकल्प पूर्ण करावे, अशी मागणी त्यांनी केली.