शहरं
Join us  
Trending Stories
1
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
2
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
3
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
4
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मनोज जरांगे-पाटील ७ वाजता पत्रकार परिषद घेणार
5
मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी
6
एअरपोर्टवर तरूणीच्या सामानाचं झालं 'चेकिंग'; पोलिसांनी बॅग उघडताच बसला धक्का.. आत काय निघालं?
7
बापरे! कच्च्या कांद्यामुळे आरोग्याचं मोठं नुकसान; समजल्यावर खाण्यापूर्वी कराल १०० वेळा विचार
8
पीएम मोदींना शिवीगाळ! अमित शाह म्हणाले- 'तुम्ही जितक्या शिव्या द्याल, तितके कमळ फुलेल...'
9
'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा टीझर प्रदर्शित, वरुण धवन दिसला बाहुबली अवतारात
10
मुलीने बॉयफ्रेंडशी लग्नाचा तगादा लावला, बापाने लेकीचा आवाज बंद केला; मृतदेह लटकवून वेगळाच बनाव रचला 
11
ट्रम्प टॅरिफच्या संकटातही भारताची आर्थिक गाडी सुस्साट! GDP च्या वाढीत चीनलाही टाकलं मागे
12
पंक्चरचं दुकान अन् व्यवसायानं ड्रायव्हर; पंतप्रधान मोदींना शिवीगाळ करणारा तो' कोण?
13
नारळ पाणी प्यायल्याने खरंच कमी होतं का वजन? डॉक्टरांनीच सांगितलं 'हे' सत्य
14
सुवर्णसंधी! एनएचपीसीमध्ये विविध पदांसाठी भरती; २ सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात
15
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५ वर्षांत मिळवा ५ लाख रुपये व्याज! मुलांच्या नावावरही करू शकता गुंतवणूक
16
Video: दोन सिंहांमध्ये जुंपली... तुफान भांडण, एकमेकांवर हल्ले... पाहा कोण कुणावर भारी?
17
Ganpati Visarjan 2025: बाप्पाचे विसर्जन करताना जगबुडी नदीचे पाणी वाढले अन् तिघे गेले वाहून
18
उत्तराखंडमध्ये पुन्हा आभाळ फाटले, दोन ठिकाणी ढगफुटी, 10 जण ढिगाऱ्याखाली; दोन जखमी
19
लग्नानंतर आधार कार्डवरील नाव कसे बदलावे? सोपी ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रक्रिया जाणून घ्या
20
मुकेश अंबानींनी केली नव्या कंपनीची घोषणा...! आता कोणता बिझनेस करणार? जाणून घ्या

पंडित जवाहरलाल नेहरूंना काँग्रेसजनांची आदरांजली

By admin | Updated: November 16, 2015 00:53 IST

आधुनिक भारताचे शिल्पकार, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे वतीने ...

शतकोत्तर रजत जयंती पर्व : विविध कार्यक्रमांचे केले जाणार आयोजनचंद्रपूर : आधुनिक भारताचे शिल्पकार, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे वतीने शनिवारी स्थानिक गांधी चौकातील काँग्रेस कार्यालयात आदरांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पंडितजींच्या शतकोत्तर रजत जयंती पर्वानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गजानन गावंडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपूरचे माजी नगराध्यक्ष डॉ. सुरेश महाकुलकर, मनपाचे काँग्रेसचे गटनेता प्रशांत दानव, उपगटनेता महेंद्र जयस्वाल, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव अशोक नागापुरे व प्रवीण पडवेकर, शहर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुधाकरसिंह गौर, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस (ओ.बी.सी.) विभागाचे अध्यक्ष देवेन्द्र बेले, सेवादलाचे जिल्हा प्रमुख प्रमोद राखुंडे, अ‍ॅड. अरुण धोटे (राजुरा ता.काँ. अध्यक्ष), नगरसेवक राजेश रेवल्लीवार, श्रीनिवास पारनंदी, नगरसेविका वीणा खनके, सकीना अंसारी, शिल्पा आंबेकर उपस्थित होते.याप्रसंगी प्रा. प्रमोद राखुंडे, अरुण बुरडकर, प्रवीण पडवेकर, प्रशांत दानव, अ‍ॅड. अरुण धोटे, देवेंद्र बेले यांची प्रसंगोचित भाषणे झालीत.आपल्या अध्यक्षीय भाषणात गजानन गावंडे म्हणाले, आधुनिक भारताचे शिल्पकार भारतरत्न पं. जवाहरलाल नेहरू यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्य त्यांच्या स्मृतींना विनम्र आदरांजली अर्पण करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी स्वातंत्र्य प्राप्तीसाठीच्या अनेक आंदोलनामध्ये पं. नेहरूंनी देशप्रेमाने व उत्कट देशभक्तीने प्रेरीत होऊन म. गांधीजींच्या मार्गदर्शनात भाग घेतला. या स्वातंत्र्य लढ्याच्या दरम्यान पं. नेहरूंना नऊ वर्षाचा कारावासही भोगावा लागला.भारताला जगात महासत्ता बनविण्याचा पाया खऱ्या अर्थाने पं. नेहरूजींच्या काळातच घातला गेला. परंतु आज एनडीए सरकारच्या काळात धर्मांध शक्ती डोके वर काढीत आहे. जातीय तेढ वाढविली जात आहे. या सरकारकडून नेहरू-गांधी यांच्या अद्वितीय व अलौकिक कर्तृत्व संपन्न गौरवाला मिटविण्याचा प्रयत्न केला जात आहे.त्यामुळे १४ नोव्हेंबर २०१५ या १२६ व्या जयंती दिवसापासून ते १४ नोव्हेंबर २०१६ पर्यंतच्या वर्षात पं. जवाहरलाल नेहरूजीच्या शतकोत्तर रजत जयंतीपूर्तीनिमित्त चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या मार्गदर्शन व नियोजनातंर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे संकल्पित आहे. या कार्यक्रमात एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील तिवारी, चेतन गेडाम, आकाश मासीरकर, मोन्टी मानकर, श्रीनिवास पारनंदी, राजेश रेवल्लीवार, विनोद पिंपळशेंडे, अन्वरभाई, असलर्म नुरूद्दीन, तिगाडे, खालीकभाई, दिगंबर लोडेलीवार, राजू हरणे, राजू जयस्वाल, कृष्णा यादव, हरीदास नागपुरे यांच्यासह चंद्रपुरातील काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)