शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

पांदण रस्त्याच्या पाईप कामात सावळागोंधळ

By admin | Updated: October 13, 2016 02:26 IST

चिमूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या गडपिपरी, पुयारदंड गट ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक लक्ष्मण मिसाळ यांनी एमआरई जिस अंतर्गत गावातील पांदण रस्त्याची कामे केली.

गडपिपरी-पुयारदंड रस्ता : ग्रामसेवकाला निलंबित करण्याची मागणीचिमूर : चिमूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या गडपिपरी, पुयारदंड गट ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक लक्ष्मण मिसाळ यांनी एमआरई जिस अंतर्गत गावातील पांदण रस्त्याची कामे केली. रस्त्यात सिमेंटचे पाईप टाकण्यात आले. कामाचे बिलही उचलण्यात आले. मात्र ग्रामसेवकाने कुठल्याही प्रकारची निविदा न काढता परस्पर काम केले. उचल केलेल्या बिलात तफावत असून झालेले काम निकृष्ट दर्जाचे आहे. या कामात अनियमितता असून भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख विलास डांगे यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे.एमआरईजीएस अंतर्गत पांदन रस्त्याचे काम सन २०१४-१५ ला करण्यात आले. भिसी-शंकरपूर रोड ते गुंडेराव थुटेपर्यंत व गोडणगाव ते लक्ष्मन भोयर कन्हाळगाव पादंन रस्त्यामध्ये सिमेंट पाईप टाकण्यात आले. या पाईपसाठी एक लाख २० हजार रुपयांची उचल केली. मात्र या कामाची कुठलीही निविदा काढण्यात आली नाही व ग्रामपंचायतला विश्वासात सुद्धा घेण्यात आले नाही. परस्पर स्वमर्जीने काम केले. सदर काम पूर्णता निकृष्ट दर्जाचे आहे. या कामात अनियमितता असून कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे.पुयारदंड येथील सरपंच वसता जांभुळे यांनी निवडणूक लढविली, तेव्हा त्यांच्याकडे शौचालय नव्हते. बेसलाईनला त्यांच्याकडे शौचालय नसल्याची नोंद आहे. तरीही जांभुळे व ग्रामसेवक मिसाळ यांनी संगणमत करुन शौचालय असल्याचे खोटे प्रमाणपत्र तयार करुन प्रशासनाची दिशाभूल करीत फसवणूक केली व सन २०१६-१७ या वर्षात शौचालय मंजूर केले. तसेच ग्रामपंचायत सदस्य अश्विन प्रफुल उर्फ अमोल पाटील यांच्याकडे शौचालय नसतानाही ग्रामसेवकाने निवडणुकीत प्रमाणपत्र दिले. या संदर्भात सरपंच रंजना पाटील व कुंदा वानखेडे यांनी वरिष्ठांकडे तक्रार दोनदा दिली. मात्र ग्रामसेवकांवर अजूनही कारवाई झाली नाही. तर ग्रामसेवक २७ जानेवारी, १५ आॅगस्ट व १ मे महाराष्ट्र दिनाच्या खास ग्रामसभा न घेता गैरहजर असल्याचेही डांगे यांनी परिषदेत सांगितले. ग्रामसेवक लक्ष्मण मिसाळ यांनी प्रसिद्ध पत्रकातून माध्यमांना दिलेली माहिती खोटी व चुकीची असून प्रशासनाची दिशाभूल करणारी आहे. माध्यमाद्वारे मिसाळ यांनी माझ्यावर खंडणी मागण्याचा आरोप केला आहे. आपण जर खंडणी मागितली असेल तर ग्रामसेवकांनी स्वतंत्र चौकशी लावावी. ग्रामसेवक मिसाळ यांच्याशी आपण कधीही प्रत्यक्ष बोललो नाही. मात्र ग्रामसेवक मिसाळ यांनी प्रसिद्धी पत्रकातून खोटी माहिती पुरवून माझी बदनामी केली असल्याचे सांगत एमआरईजीएसच्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्या व आपले वरिष्ठ मंत्र्यांशी संबंध असल्याचे भासवून दबाव आणणाऱ्या ग्रामसेवक मिसाळ यांना निलंबित करण्याची मागणी विलास डांगे यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे.पत्रकार परिषदेला बोथलीचे उपसरपंच तानाजी सहारे, कमलाकर बोरकर, अजित सुकारे, रमेश मिलकर, सूर्यभान खोब्रागडे, कवडू धानोरकर, संतोष कामडी, सचिन खाडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)तहसील कार्यालयापुढे धरणे आंदोलनातून माझ्यावर लावलेल्या आरोपाचे प्रथम पुरावे सादर करावे, नंतरच नवीन आरोप करावे. गडपिपरी, पुयारदंड, गट ग्रामपंचायतीच्या पांदन रस्त्यात कुठलाही भ्रष्टाचार झाला नाही. कामाचे कोटेशन काढण्यात आले. सरपंच वसंता जांभुळे यांची शौचालयाची पेंडींग फाईल होती. अनावधनाने शौचालय मंजूर झाले. मात्र त्याच्या कामाचे बिल रोखून धरले आहे. अश्विनी प्रफुल उर्फ अमोल पाटील यांच्या घराची शहानिशा करुनच शौचालयाचे प्रमाणपत्र दिले. माझ्याकडे दोन ग्रामपंचायतीचा पदभार असल्याने वेळेअभावी एकाच ग्रामसभेला हजर राऊ शकतो तर दुसऱ्या ग्रामसभेला जाता येत नाही.- लक्ष्मन मिसाळ, ग्रामसेवक गडपिपरी, पुयारदंड