शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत समितीच्या जिन्यावर दारूच्या बाटल्यांचा खच

By admin | Updated: April 21, 2017 00:54 IST

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाली असली तरी जिवती तालुक्यातील दारूबंदी केवळ कागदावरच असल्याचे चित्र जिवती पंचायत समितीच्या

दारूबंदी कागदावरच: कार्यालयच झाले दारूचा अड्डा शंकर चव्हाण/संघरक्षीत तावाडे   जिवतीचंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाली असली तरी जिवती तालुक्यातील दारूबंदी केवळ कागदावरच असल्याचे चित्र जिवती पंचायत समितीच्या जिन्यावरील व परिसरातील कचऱ्यात पडलेल्या रिकाम्या दारूच्या बाटल्या पाहिल्यावर दिसून येते. कार्यालयाच्या आवारात गुटखा, तंबाखू, खर्रा खाऊन थुंकू नये, अन्यथा कारवाही करण्यात येईल, असे पोस्टर्स भिंतीला लावले गेले आहेत. असे असतानाही काही कर्मचाऱ्यांनी छुप्या मार्गाने दारू आणून कार्यालयाच पिणाऱ्यांचे बिंग ‘लोकमत’ने १५ एप्रिल रोजी केलेल्या स्टिंग आॅपरेशन करून उघडकीस आणले आहे.जिवती तालुका हा तेलंगणा सीमेलगत असल्याने चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी होऊनही जिवतीत विशेष फरक पडला नाही. कारण येथून जवळच पुग्गागुडा, इंद्रामनी व केटानेरी येथे तेलंगना राज्याची दारू मिळते. त्यामुळे पिणाऱ्यांची संख्या कमी झाली नाही, उलट वाढतच चालली आहे. त्यामुळे अवैध दारू विक्रेतेही जिवतीत मान वर करू लागले आहेत. कर्मचारी मात्र कार्यालयात कुणीही लक्ष देत नाही म्हणून छुप्या मार्गाने दारू आणून आपली तलप भागवित आहेत.शासकीय कार्यालयात कुठलीही नशाबाजी करणे कायद्याने गुन्हा असला तरी याच कायद्याला फाटा देत कार्यालयात दारू पिवून रिकाम्या दारूच्या बॉटल्स् जिन्यावर व परिसरातील कचऱ्यात फेकले जात असल्याने मोठ्या प्रमाणात बॉटल्स् पडून असल्याचे आढळून आले. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार शासकीय कार्यालयातच राजरोसपणे सुरू असतानाही संबंधीत अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष का, करावे असा प्रश्न निर्माण होत आहे. ज्या कार्यालयातुन जनतेच्या हिताचे काम केले जाते, त्याच कार्यालयात आता दारूच्या बॉटल्स् बघायला मिळत आहे. दारूबंदीनंतर येथे दारू मिळते कशी व कार्यालयातच दारू पिण्याची हिंमत कशी वाढली, या संपूर्ण बाबीवरून कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. तहसीलदारांकडून कर्मचाऱ्यांची खरडपट्टी परिसरातील कचऱ्यात मोठ्या प्रमाणात दारूच्या रिकाम्या बॉटल्स् असल्याचा गंभीर प्रश्न ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन केल्यानंतर उघडकीस आणला. त्यामुळे तहसीलदार रविंद्र राठोड यांनी पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांना बोलावून चांगलीच खरडपटी केली व पुन्हा दारूच्या बॉटल्स् दिसल्यास कारवाई करण्याचे सुनावले.