शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पेल्लोरा-निर्ली रस्त्याची स्थिती दयनीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 23:19 IST

राजुरा तालुक्यातील निर्ली ते पेल्लोरा ही दोन गावे अद्यापरस्त्यांनी जोडली नाहीत. परिणामी, पावसाळ्यात नागरिकांचे हात होतात.

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : राजुरा तालुक्यातील निर्ली ते पेल्लोरा ही दोन गावे अद्यापरस्त्यांनी जोडली नाहीत. परिणामी, पावसाळ्यात नागरिकांचे हात होतात.निर्ली येथील विद्यार्थ्यांना झाडे- झुडूपांमधून वाट काढत पेल्लोरा येथील शाळा महाविद्यालयात जावे लागते.निर्ली आणि पेल्लोरा येथील शेतकºयांना शेताकडे जाण्यास मोठी गैरसोय होत आहे. यासंदर्भात नागरिकांनी प्रशासनाकडे अनेकदा निवेदन दिले. मात्र, दखल घेण्यात आली नाही. हा रस्ता कढोली (बु.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत जोडला असल्याने या परिसरातील रुग्णांना उपचारास जाण्याकरिता आवश्यक आहे. हडस्ती मार्गावर पुल तयार केल्यास किनबोडी व पेल्लोरा येथील नागरिकांना चंद्रपूरला जाण्यास सोयीचे होणार आहे. या मार्गावरील निर्ली जवळील नाल्यावर पुलाचे बांधकाम न झाल्याने पावसाळ्यात हाल होतात. साखरी आणि निर्ली परिसरातील शंकरदेव मंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीला यात्रा भरते. हजारो भाविक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होतात. मात्र जाण्याकरिता मार्ग नसल्याने एक किमी अंतरावर मोठी कसरत करावी लागते. सरकारने ग्रामीण भागातील रस्ते बांधण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. परंतु, कोरपना व राजुरा तालुक्यातील अनेक गावांत अद्याप रस्ते नाहीत. विद्यार्थ्यांना पायी जावे लागते.पावसाळ्यात शाळेत जाता येत नाही. ग्रामस्थांनी वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाने हा प्रश्न अद्याप सोडविला नाही. त्यामुळे आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांची भेट घेवून रस्त्याची मागणी करण्यात आलेली आहे. शिवाय, सार्वजनिक बांधकाम विभागाकडेही वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. मात्र रस्त्याचे बांधकाम करण्यास अद्याप मंजुरी देण्यात आली नाही. पेल्लोरा, किनबोडी, निर्ली, चार्ली येथील ग्रामस्थांच्या निवेदनाला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. त्यामुळे विद्यार्थी व नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, ग्रामस्थांनी जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव उमाकांत धांडे यांच्या नेतृत्वात चार्ली येथील सरपंच पोर्णिमा दुबे, उपसरपंच किशोर ढुमणे, पेल्लेराचे सरपंच जितेंद्र दुबे, उपसरपंच बालाजी भोयर, माजी सरपंच विनोद झाडे, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद धांडे, जयश्री विजय धांडे, मंगेश भोयर, सेवा सहकारी सोसायटीचे उपाध्यक्ष बाळा ढुमणे, संचालक संजय उमरे, किशोर अडबाले, जगदी सुर्तीकर आदींनी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले.