शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
2
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
3
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
4
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
5
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
6
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
7
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
9
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
10
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
11
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
12
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
13
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
14
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
15
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
16
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
17
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
18
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
19
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

पालेबारसा-उसरपार चक कालवा फुटलेलाच

By admin | Updated: October 19, 2015 01:34 IST

सावली तालुक्यातील पालेबारसा येथील कॅनलपासून ३०० फुट अंतरावरील नहर मागील वर्षापासून फुटला ...

शेकडो एकर धानपीक धोक्यात : संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्षसावली : सावली तालुक्यातील पालेबारसा येथील कॅनलपासून ३०० फुट अंतरावरील नहर मागील वर्षापासून फुटला असल्याने ४०० एकर शेती करपण्याच्या अवस्थेत आहे. हा नहर ब्रह्मपुरी गोसेखुर्द उजवा कालवा अंतर्गत येत असल्याने विभागीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे २५० शेतकरी लाभार्थ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. पीक गर्भावस्थेत असल्याने पाण्याची नितांत गरज आहे. वेळेवर पाणी पोहाचेले नाही तर शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे.यासंदर्भात शेतकरी कार्यालयाला जाऊन भेटले असता उद्या, परवा येतो म्हणून खोटे आश्वासन देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी धान पीक वाचविण्यासाठी हात उसणे पैसे घेऊन, मजुरीचे माणसं लावून जेसीबी, पोकलॅड मशीन बोलावून काम करवून घेत आहेत. ही विचित्र अवस्था परिसरातील शेतकऱ्यांची पाहायला मिळत आहे. तरीही गोसेखुर्द ब्रह्मपुरी विभाग जागे होत नसून कामासाठी हात झटकून देत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत राष्ट्रवादी युवा काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष खुशाल लोडे यांनी वरिष्ठांकडे निवेदनातून तक्रार केली आहे.पालेबारसा या गावाची शेती ब्रह्मपुरी गोसेखुर्द उजव्या कालव्याला लागून आहे. उसरपार चक कॅनल नं. ९० असून या मायनरमधून पाण्याचा पुरवठा शेतीला होत असतो. या कॅनलचे काम अग्रवाल कंपनी नागपूरकडे होते. मागील वर्षी पावसामुळे हा कॅनल (नहर) फुटला. त्या जागेवरच २० फुट खोल खड्डा पडला. परिणामी अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. या ठिकाणापासून पुढे ३०० फुट अंतरावर पाणी पोहोचवायचे आहे. आधीच पावसाची पाणी कमी होत असताना यावर्षी पण गोसेखुर्द कालव्याचे पाणी शेतीला मिळणार याची शाश्वती नव्हती. परंतु नेत्याच्या आशीर्वादाने गोसेदुर्खचे पाणी कॅनलपर्यंत पोहोचले. शेतकऱ्यांना आशेचा नवा किरण दिसला. जलपूजनाचा कार्यक्रम आटोपून नेते मोकळे झाले. परंतु कॅनला लागून असणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष झाले. शेतीला पाणी पोहोचण्याची अडचण कायमच राहिली. शेवटी बाप दाखव नाही तर श्राद्ध कर अशी परिस्थिती येवून ठेपल्याने लाभार्थ्यांची कार्यालाकडे धावाधाव वाढली. मात्र कार्यालयाच्या अधिकाऱ्यांचा दुर्लक्षपणा स्पष्ट दिसून आला. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे पुन्हा कर्जाचा डोंगर डोक्यावर घेवून शेतकऱ्यांना शेती करावी लागत आहे. असे असतानाही ब्रह्मपुरी गोसेखुर्द उजवा कालवा विभागाचे अधिकारी कुंभकर्णी झोपेतच आहेत. एरवी शेतकऱ्यांची समस्या सोडविणाारे नेतेही हातावर हात ठेवून गप्प आहेत.उसरपार चक कॅनल नं. ९० चे पाणी पालेबारसा मायनरला येत असून याला लागून शेकडो एकर शेती आहे. याच कॅनलच्या भरोशावर येथील शेतीला पाणीेपुरवठा होतो. जवळच तलाव आहेत. पण पाऊस न पडल्याने ते कोरडे आहेत. पाण्याचे दुसरे साधन नसल्याने याच कालव्याच्या भरोशावर अवलंबून राहावे लागते. धान शेतीला भेगा पडल्या आहेत. किडी व रोगाचा प्रादूर्भाव वाढला आहे. बांधीत पाणी नसल्याने फरवारणी करता येत नाही. जमीन कडक असल्याने धानपीक करपण्याच्या मार्गावर आहे. वर्षभराचे आर्थिक नियोजन विस्कळीत झाले आहे. शेवटी पाण्याची सोय विभाग करत नसल्याने तेलही गेले तुपही गेले हाती धुपारणे आल्याची अवस्था बघायला मिळत आहे. त्यामुळे कर्जाच्या बोझ्यात शेतकऱ्याचे जीवन कायम आहे.फुटलेला कालवा दुरुस्ती करण्यासाठी ब्रह्मपुरी उजवा कालवाच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही अधिकारी वर्गाला जाग नाही. लोकप्रतिनिधींनीही याकडे पाठ फिरविली आहे. या संदर्भात राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष खुशाल लोडे यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. (तालुका प्रतिनिधी)