शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाच नगरपंचायतींच्या निवडणुकीचे पडघम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2021 05:00 IST

सावली, पोंभुर्णा, गोंडपिंपरी, कोरपना व जिवती नगरपंचायतीमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या जागा धरून आरक्षणाच्या एकूण जागा ५० टक्क्यांच्या वर जात असल्याने या पाच नगरपंचायतींमध्ये प्रभागातील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील महिला, तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांचे आरक्षण सोडत पद्धतीने निश्चित करायचे आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पीठासीन अधिकाऱ्यांच्या नेमणुकीचे आदेश जारी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सावली, पोंभुर्णा, गोंडपिंपरी, कोरपना व जिवती नगरपंचायत  निवडणुकीचे पडघम लवकरच वाजणार असल्याने विविध राजकीय पक्षांचे लक्ष आरक्षण सोडतीकडे लागले आहे. येत्या १२ नोव्हेंबरला आरक्षण सोडत जाहीर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पीठासीन अधिकाऱ्यांच्या नेमणुकीचे आदेशही जारी केले.  सावली, पोंभुर्णा, गोंडपिंपरी, कोरपना व जिवती नगरपंचायतीमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या जागा धरून आरक्षणाच्या एकूण जागा ५० टक्क्यांच्या वर जात असल्याने या पाच नगरपंचायतींमध्ये प्रभागातील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील महिला, तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांचे आरक्षण सोडत पद्धतीने निश्चित करायचे आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पीठासीन अधिकाऱ्यांच्या नेमणुकीचे आदेश जारी केले.सावली नगरपंचायतीसाठी उपविभागीय अधिकारी मूल, पोंभुर्णासाठी उपविभागीय अधिकारी बल्लारपूर, गोंडपिपरीसाठी उपविभागीय अधिकारी गोंडपिपरी, कोरपनासाठी उपविभागीय अधिकारी राजुरा आणि जिवतीसाठी उपविभागीय अधिकारी चंद्रपूर हे आरक्षणसोडतीसाठी नियुक्तलेले पीठासीन अधिकारी आहेत. आरक्षण सोडत शुक्रवार, १२ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी १२ वाजता संबंधित नगरपंचायत कार्यालयात होणार आहे. आरक्षण निश्चित करण्याच्या सोडतीच्या वेळी नगरपंचायतीच्या क्षेत्रातील इच्छुक नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

मतदार नोंदणी मोहिमेचा लाभ घ्या-जिल्हाधिकारी भारत निवडणूक आयोगाने  १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम जाहीर केला.  त्यानुसार १ नोव्हेंबर २०२१ रोजी एकत्रिकृत प्रारूप मतदार यादी तर ५ जानेवारी २०२२ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. या कालावधीत दावे व हरकती स्वीकारणे तसेच निकाली काढण्यात येईल. त्यामुळे १८ वर्षे पूर्ण करणारे नागरिक व अन्य पात्र नागरिकांनीही या विशेष मोहिमेचा लाभ घेऊन मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत उपस्थित होते.

८२६ ग्रामपंचायतींत विशेष ग्रामसभाचंद्रपूर :  मतदार नोंदणीसाठी ग्रामपंचायतीमध्ये १६ नोव्हेंबरला विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे. मतदार यादीमधील नोंदीबाबत नागरिकांना हरकती किंवा नोंदीत दुरुस्ती करावयाची असल्यास किंवा नाव नसलेल्या पात्र नागरिकांना नाव नव्याने नोंदविण्यासाठी विहित अर्ज ग्रामसभेत उपलब्ध करून देण्यात येतील.  ग्रामपंचायत कार्यालयात आधीच संबंधित मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयाकडून आवश्यक अर्जाच्या फार्मचे नमुने उपलब्ध करून देण्यात येत आहे. मयत मतदारांची वगळणी, कायम स्थलांतरित मतदारांची वगळणी, लग्न होऊन बाहेर गेलेल्या महिलांच्या नावांची वगळणी तसेच लग्न होऊन गावात आलेल्या महिलांच्या नावांची नोंदणी, दिव्यांग मतदार चिन्हांकित करण्यात येणार आहे. १ जानेवारी २०२२ रोजी १८ वर्षे पूर्ण झालेली नवीन मतदार म्हणून नोंदणी या कामावर भर देण्यात येईल. याच दिवशी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी हे ग्रामसभेत उपस्थित राहून दावे व हरकती स्वीकारणार आहेत.  मतदार यादीत नावे समाविष्ट नसलेल्या नागरिकांना संबंधित गावच्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन मतदार यादीत आपले नाव नोंदणी करून घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले.

 

टॅग्स :Electionनिवडणूक