शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो हेक्टरवरील धानपीक नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 23:54 IST

परिसरातील धानपिकांवर यावर्षी मोठ्या प्रमाणात मावा- तुडतुडा व इतर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देनुकसान भरपाईची आशा : पोंभुर्णा तालुक्यातील शेतकरी संकटात

लोकमत न्यूज नेटवर्कपोंभुर्णा : परिसरातील धानपिकांवर यावर्षी मोठ्या प्रमाणात मावा- तुडतुडा व इतर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पोंभुर्णा तालुक्यातील शेकडो हेक्टरमधील धानपीक न कापताच शेतात उभे आहे. रोगग्रस्त धानाची कापणी करूनही त्या तणसाला जनावरेही खावू शकत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी उभे पीक जाळून टाकले आहे. त्यामुळे परिसरामध्ये जनावरांच्या चाºयाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.चंद्रपूर जिल्ह्यात धान उत्पादक व सिंचन विरहीत मागास तालुका म्हणून ओळख असलेल्या पोंभुर्णा तालुका परिसरामध्ये यावर्षी तुरळक पाऊस पडला तरी धानिपक चांगल्या स्थितीमध्ये होते. मात्र धानपिक गर्भाशयात असतानाच विविध प्रकारच्या रोगांनी हल्ला चढविल्याने यावर नियंत्रण मिळविण्यासाठी परिसरातील शेतकºयांनी विविध प्रकारची महागडी औषधी घेऊन फवारणी केली.त्यांच्या या परिश्रमाला काही प्रमाणात यशसुद्धा आले. त्यामुळे बेरड, लाल्या, पिवळा करपा आदी रोग नियंत्रणात आणता आले. काही प्रमाणात तग धरुन असलेले धानपिक हाती येण्याची शक्यता होती.परंतु तग धरुन असलेल्या धानपिकावर परत मावा-तुडतुडा या रोगाने ग्रासल्याने धान परिपक्व होण्याच्या उंबरठ्यावर असतानाच त्याचे तणसामध्ये रुपांतर झाले. औषधांची वारंवार फवारणी आणि रोगाची प्रचंड प्रतिकार शक्ती, यामुळे जनावरेसुद्धा या तणसाला तोंड लावत नाही.शेतकऱ्यांनी अशा पिकांची कापणी न करताच शेतातच उभे ठेवले असून काहीजण याचा जनावरांवर विपरीत परिणाम होवू नये, यासाठी पीक जाळून टाकत आहेत. शासनाने याची दखल घेवून मदत देण्याची मागणी शेतकºयांची आहे.काँग्रेसच्या शिष्टमंडळाकडून धानपिकाची पाहणीधान नष्ट झाल्याची तक्रार परिसरातील काही शेतकºयांनी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्याकडे केली. त्यामुळे देवतळे यांनी बुधवारी पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द येथील शेतकरी बंडू सोमा टिकले यांच्या शेतामध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांच्या सोबत बल्लारपूर येथील नगरसेवक अब्दुल करीमभाई, जिल्हा महासचिव अरविंद मडावी, फाखभाई, कुनाल गाडगे, राकेश नैताम, राजू बुरांडे, निलकंठ नैताम, विनोद बुरांडे, ज्ञानेश्वर घुग्घुस्कार आदी उपस्थित होते. यावेळी देवतळे यांनी शेतकºयांच्या या गंभीर प्रश्नावर आपण अधिवेनात दाद मागणार असून शेतकºयांना नुकसान भरपाई व चाऱ्याचा प्रश्न सोडवण्याची प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.तूर पिकावरही रोगांचा प्रादुर्भावपेंढरी : वडसी, खातोडा, गोंदोडा, केवाडा, पेंढरी (कोके), आलेसुर, नैनपूर, मोटेगाव, महादवाडी, पेठ, खुटाळा, काजळसर भागात धान, तूर, वेलवर्गीय पिकांवर मावा-तुरतुडा रोगाचा प्रार्दुभाव असल्याने सर्व पीक नष्ट झाले आहेत. यावर्षी या भागात कमी पाऊस झाल्यामुळे धानाची रोवणी आटोपली. मात्र गर्भाशयात असलेल्या धानावर तसेच तूर, भोपळा, दुधी व इतर पिकांवर मावा तुडतुडा व इतर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने सर्व पीक नष्ट झाले आहेत. त्यामुळे बळीराजा मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला आहे. कर्ज काढून कसेतरी धान पिकाची रोवणी केली. परंतु निसर्गाने ते हिरावल्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. या भागात जिल्हा प्रशासनाने सर्वेक्षण करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.कर्ज काढून कशीतरी रोवणी केली. परंतु तेही पीक रोगाने नष्ट झाले. शासनाने नुकसान भरपाई देवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.- सुनील चांदेकर, शेतकरी वडसी (खातोडा)

टॅग्स :Farmerशेतकरी