शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
3
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
4
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
5
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
6
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
7
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
8
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
9
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
10
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
11
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

धान रोवणीच्या कामांना आला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 22:49 IST

जुलै महिन्यात १५ ते २० दिवसाची पावसाने उसंत घेतली. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या आकाशाकडे नजरा लागल्या होत्या. परिणामी शेतकरी चिंताग्रस्त होते. दरम्यान, वरुणराजाच्या कृपेने गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जिल्हाभरात संततधार पाऊसाने हजेरी लावली. त्यामुळे या पावसाने धान पिकाच्या रोवणीस सध्या वेग आला आहे.

ठळक मुद्देजलसाठ्यात झाली वाढ : पावसाच्या पुनरागमनाने शेतकरी सुखावला

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: जुलै महिन्यात १५ ते २० दिवसाची पावसाने उसंत घेतली. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या आकाशाकडे नजरा लागल्या होत्या. परिणामी शेतकरी चिंताग्रस्त होते. दरम्यान, वरुणराजाच्या कृपेने गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जिल्हाभरात संततधार पाऊसाने हजेरी लावली. त्यामुळे या पावसाने धान पिकाच्या रोवणीस सध्या वेग आला आहे.भरपूर पावसाचे समजले जाणारे आद्रा व पुनर्वसन हे दोन नक्षत्र कोरडे गेल्याने धान पऱ्हे करपण्यास सुरुवात झाली होती. अनेक शेतकऱ्यांच्या रोवणीचे काम खोळंबले होते. पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी असताना २५ जूनपासून जिल्ह्यात पाऊस बरसला. रविवारी आणि सोमवारीही दिवसभर संततधार पाऊस सुरु होता. संततधार पावसामुळे जिल्हाभरातील नदी, नाले, तलाव, बोड्या आदींच्या जलसाध्यात वाढ झाली आहे. जलसाठ्यात वाढ झाल्याने याचा फायदा खरीप हंगामातील धान पिकाला होणार आहे. शेतकरी मध्यंतरीच्या काळात पावसाच्या प्रचंड प्रतिक्षेत होता. दरम्यान अनेक गावांमध्ये पूजा- अर्जा करुन वरुण राजाला पाऊस पडण्यासाठी साकडेही घालण्यात आले. मात्र पाऊस बरसत नव्हता. अखेर चार दिवसांपासून पाऊस सुरु झाला. दमदार व संततधार पाऊस होत असल्यामुळे शेतजमिनीत रोवणी योग्य पाणी साचले आहे. ज्या शेतकºयांनी यापूर्वीच धान पिकाचे पºहे टाकले. त्याचे पऱ्हे सुद्धा रोवणी योग्य झाले आहे. जिल्ह्यातील सिंदेवाही, पोंभूर्णा, ब्रह्मपुरी, सावली, मूल आदी तालुक्यातील शेतकºयांनी आपल्या शेतातील धान रोवणीच्या कामास प्रारंभ केला आहे. मागील काही वर्षांपासून शेतीची कामे करण्यास मजूर मिळत नाही. मजुराची टंचाई भासते. त्यामुळे काही शेतकरी बाहेरगावावरुन मजूर आणत असून रोवणीची कामे करून घेत आहेत. ज्या गावात बहुतांश जणांकडे शेतजमीन आहे. असे लोक स्वत:च्या शेतातील रोवणी आटोपल्याशिवाय दुसºयाच्या रोवणीच्या कामास जात नाही. त्यामुळे बाहेरगावच्या मजूरांचा आधार घेतला जात आहे. एकूणच सर्वत्र धानपिक रोवणीची लगबग सुरु झाली आहे. दरम्यान, कोरपना, राजुरा,जिवती, वरोरा तालुक्यात कापूस उत्पादक शेतकरी असून या शेतकºयांनाही पावसासामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.