शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विहिरगावात फुलले साता समुद्रापारचे ड्रॅगन फ्रूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 05:00 IST

कांताई ड्रॅगन फ्रूट फार्म विहीरगावचे कवडू बोढे हे २०१७ मध्ये वेकोलितून सेवानिवृत्त झाल्यानंतर २०१८मध्ये शेतीकडे वळले. दोन एकर असलेल्या शेतीत पारंपरिक पध्दतीने शेती केली. त्यात त्यांना फारसे उत्पन्न मिळाले नाही. तेव्हा पारंपरिक शेतीला फाटा देण्याचे ठरविले. दोनपैकी एक एकरात आरोग्यदायी फळ असलेल्या ड्रॅगन फ्रूटची लागवड करण्याचा निर्धार केला. मात्र, जिल्ह्यात पहिल्यांदाच या पिकाची लागवड केल्याने त्यांना खूप अभ्यास करावा लागला.

नितीन मुसळे / प्रकाश काळेलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पारंपरिक शेती नुकसानदायक ठरत आहे. बाजारपेठेचा वेध घेऊन व आपण काय पिकवतो, हे लक्षात घेऊन शेती केली तर शेती फायदेशीर ठरू शकते आणि असाच शेती प्रयोग राजुरा तालुक्यातील विहीरगाव येथे वेकोलिचे सेवानिवृत्त कर्मचारी कवडू रामचंद्र बोढे यांनी आपल्या एक एकरात केला. त्यांनी साता समुद्रापार पिकणाऱ्या ड्रॅगन फ्रूटची अनोखी शेती फुलवून  शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. कांताई ड्रॅगन फ्रूट फार्मचा हा चंद्रपूर जिल्ह्यातला पहिलाच प्रयोग आहे. कांताई ड्रॅगन फ्रूट फार्म विहीरगावचे कवडू बोढे हे २०१७ मध्ये वेकोलितून सेवानिवृत्त झाल्यानंतर २०१८मध्ये शेतीकडे वळले. दोन एकर असलेल्या शेतीत पारंपरिक पध्दतीने शेती केली. त्यात त्यांना फारसे उत्पन्न मिळाले नाही. तेव्हा पारंपरिक शेतीला फाटा देण्याचे ठरविले. दोनपैकी एक एकरात आरोग्यदायी फळ असलेल्या ड्रॅगन फ्रूटची लागवड करण्याचा निर्धार केला. मात्र, जिल्ह्यात पहिल्यांदाच या पिकाची लागवड केल्याने त्यांना खूप अभ्यास करावा लागला. ग्रामसेवक असलेला मुलगा रवी बोढे यांचीही मोठी साथ मिळू लागली. अधिक तापमान असलेल्या जिल्ह्यातही हा प्रयोग त्यांना यशस्वी करता आला. गुजरातवरून रोपे आणून शेतात लागवड केली. त्यासाठी सुरूवातीला सिमेंट खांब, रिंग तसेच ठिबकची सोय करून सेंद्रिय पद्धतीने विविध मिश्रणाचा वापर करीत बाग फुलविली. यासाठी त्यांना जवळपास साडेतीन लाख रुपयांचा खर्च आला. सुरुवातीला हे पीक खर्चिक वाटत असले तरी या पिकातून मिळणारा नफा हा शाश्वत स्वरूपाचा आहे. पहिल्या आणि दुसऱ्या वर्षीपेक्षा तिसऱ्या वर्षी म्हणजे यंदा त्यांना दीड लाखांचे उत्पन्न अपेक्षित असले तरी शेतीत नवनवीन प्रयोग करण्याचा बोढे यांचा मानस आहे. 

आरोग्यदायी ड्रॅगन फ्रूट -ड्रॅगन फ्रूटमध्ये व्हिटॅमिन  सी चे प्रमाण अधिक असते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी हे फळ उपयुक्त आहे. डेंग्यूसारखा  आजार झालेल्या रुग्णांच्या पांढऱ्या पेशा कमी झालेल्या असतात. या कमी झालेल्या पेशी वाढविण्यासाठी डाॅक्टरांकडून रुग्णांना ड्रॅगन फ्रूट खाण्याचा सल्ला दिला जातो शिवाय शरीरासाठी त्याचे आरोग्यदायी लाभ भरपूर असल्याने स्थानिक बाजारात मागणीही अधिक आहे.

स्थानिक बाजारपेठेत प्रतिसाद  ड्रॅगन फ्रूट  विक्रीसाठी कोणत्या शहरात न्यायचे, असा प्रश्न होता. मात्र, स्थानिक राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर शहरात मार्केटिंग केल्यानंतर अनपेक्षित प्रतिसाद मिळू लागला. २०० ते २५० रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे. 

 वडिलांनी ड्रॅगन फ्रूटची शेती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांना अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करून बागेचे व्यवस्थापन करीत आहे. हे पीक शेतकऱ्यांना वरदान  ठरेल, असा विश्वास आहे.    - रवी बोढे, विहीरगाव

 

टॅग्स :agricultureशेतीfruitsफळे