शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

ताडपत्री न बांधता कोळशाची ट्रकमधून ओव्हरलोड वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 23:23 IST

वेकोलिच्या वणी क्षेत्रातील कोळसा खाणीतून दररोज हजारो टन कोळ्शाची वाहतूक केली जाते. ही वाहतूक करताना कोळशावर ताडपत्री बांधली जात नाही. त्यामुळे प्रचंड धूळ उडत असून रस्त्यावरुन चालणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनचालकांचा जीव धोक्यात आला आहे.

ठळक मुद्देवेकोलि वणी कोळसा खाण : अपघाताची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कघुग्घूस : वेकोलिच्या वणी क्षेत्रातील कोळसा खाणीतून दररोज हजारो टन कोळ्शाची वाहतूक केली जाते. ही वाहतूक करताना कोळशावर ताडपत्री बांधली जात नाही. त्यामुळे प्रचंड धूळ उडत असून रस्त्यावरुन चालणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनचालकांचा जीव धोक्यात आला आहे.ओव्हरलोड व ताडपत्री न झाकता कोळशाची वाहतूक करणाऱ्या ट्रकमालकावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. ओव्हरलोड वाहतूक करण्याबरोबरच ट्रकवर ताडपत्री बांधणे बंधनकारक आहे. मात्र घुग्घुस परिसरातील ट्रक मालक, चालकाकडून नियमाचे सर्रास उल्लंघन होत आहे. त्यामुळे ट्रकमधील कोळसा वाहतुकीदरम्यान रस्त्यावर पडतो. त्यादरम्यान रस्त्यावरुन जाणाºया वाहन चालकाच्या अंगावर हा कोळसा पडून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे या परिसरात काही ट्रकच्या मागेपुढे ट्रक क्रमांक नाही. सदर ट्रक हा मुंगोलीकडून एसीसीमार्गे घुग्घुस पोलीस ठाण्याच्या मार्गाने जात असतो. नियमाची पायमल्ली करणाºया ट्रकमालक व चालकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.आरोग्याच्या समस्याकोळशाची धूळ उडत असल्याने ती श्वसनाद्धारे आतमध्ये जाते. त्यामुळे नागरिकांना दमा, आतड्याचे विकार, श्वसनाचे विकार अशा अनेक आजार जळत आहेत. त्यामुळे नागरिकांना विनाकारण आर्थिक भुर्दंड बसत आहे. यासोबतच कोळसा वाहतूक होत असलेल्या ट्रकच्या मागे असणाºया दुचाकीवाहनाच धुळीमुळे अपघातही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने विना ताडपत्रीद्वारे जाणाºया ट्रकवर कारवाई करावी.