गोंडपिपरी : तालुक्यातील लिखितवाडा रेती घाटातून रेती भरुन राजुरामार्गे गडचांदूरकडे निघालेल्या तीन ट्रकांना प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी वाटेत अडवून ओव्हरलोड असल्याच्या कारणावरुन पोलीस स्टेशन परिसरात लावण्यास सांगितले. यांतर जवळच्या धरमकाट्यावर मोजमाप केले. ओव्हरलोड असल्याची खात्री पटल्यानंतरही कुठली कारवाई करण्यात आली, असे विचारणा केली असता हा आमच्या विभागाचा नित्यक्रम असून माहिती असे सांगत अधिकाऱ्यांनी माहिती देणे टाळले. आज शुक्रवारी सुमारे ११.३० वाजताच्या सुमारास गोंडपिपरी - मूल मार्गावर तालुक्यातील लिखितवाडा रेती घाटावरुन रेती भरुन एमएच-३४ एम- ९४१८, एमहच-३४, एम- ९४१९, एमएच-३४, एम- ९४२० या क्रमांकाचे ताज ट्रान्सपोर्ट कंपनीचे तीन ट्रक रेती भरुन राजुराकडे मार्गक्रमण करीत असताना चंद्रपूर प्रादेशिक परिवहन अधिकारी बावीसकर यांनी वाटेत अडविले. यानंतर बावीसकर यांनी वाहन चालकाची कागदपत्रे, वाहतूक परवाना या संबंधीची कागदपत्रे पाहिली. वाहनात क्षमतेपेक्षा अतिरिक्त मालाची वाहतूक केली जात असल्याच्या संशयावरुन अडविलेले तीनही ट्रक पोलीस स्टेशन गोंडपिपरीच्या परिसरात लावण्यात आले. सदर घटनेची माहिती मिळताच वृत्त संकलनासाठी गेलेल्या पत्रकारांना अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास टाळले. (तालुका प्रतिनिधी)
ओव्हरलोड वाहतूक करणारे तीन ट्रक पकडले
By admin | Updated: July 5, 2014 01:19 IST