शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

जिल्ह्यातील पाच रेल्वे फाटकांवर ओव्हरब्रीज

By admin | Updated: February 6, 2017 00:39 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील मध्ये रेल्वे मार्गावरील काही समपार फाटकांवर (लेव्हल कॉसिंग) रेल्वे ओवरब्रिजची उभारणी करण्यासाठी्र रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांचेकडे मागणी केली होती.

मंत्र्यांची माहिती : आदिलाबाद गडचांदूर रेल्वे लाईनच्या कामास लवकरच प्रारंभचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील मध्ये रेल्वे मार्गावरील काही समपार फाटकांवर (लेव्हल कॉसिंग) रेल्वे ओवरब्रिजची उभारणी करण्यासाठी्र रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांचेकडे मागणी केली होती. रेल्वे मंत्र्यांनी त्यांच्या या मागणीची दखल घेवून जिल्ह्यातील येन्नोरे- नागरी, चिकणी- वरोरा, माजरी- भांदक, ताडाळी- घुग्घुस येथील दोन लेव्हल क्रॉसिंगवर रेल्वे ओवरब्रिज उभाऱ्यास मान्यता प्रदान केली आहे. यासाठी निधीची तरतूद केली आहे. आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये या सर्व ओव्हरब्रिजच्या उभारणीस प्रारंभ होत असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली.सेवाग्राम- बल्लारशाह रेल्वे मार्गावरील एलसी नं. १९, येन्नोर- नागरी ८०४/१२-१४ किमी या समपार फाटकावर ओव्हरब्रिजच्या उभारणीसाठी १६.५ करोड रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला असूनएलसी नं. २७, चिकनी- वरोरा किमी ८२६/२९ वरील ओव्हरब्रिजसाठी १६.५ कोटी एलसी नं. ३९ ए ताडाळी- घुग्घुस किमी ८६५/१६ व एलसी नं. ३९ ताडाळी- घुग्घुस ८७५०२-३ वरील ओव्हरब्रिजकरिता अनुक्रमे १५ कोटी व १६.५ कोटी रुपयांचा निधीस मंजुरी प्राप्त झालेली आहे. मागील अनेक वर्षापासून या सर्व समपार फाटकांवर रेल्वे ओवरब्रिज उभारण्यात यावेत, अशी मागणी त्या परिसरताील रेल्वे प्रवासी व नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत होती. त्यामुळे केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी या सर्व लेव्हल क्रासिंग फाटकांची माहिती रेल्वे मंत्र्यांना सादर करुन या सर्व फाटकांवर ओव्हरब्रिज उभारण्याची मागणी केली होती. केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी ना. अहीर यांच्या मागणीची तात्काळ दखल घेत २०१७-१८ च्या अंदाजपत्रकात या रेल्वे ओव्हरब्रिजला निधी उपलब्ध करुन मान्यता प्रदान केंल्याने गेल्या अनेक वर्षापासूनचा रेल्वे ओवरब्रिज उभारणीचा प्रलंबित प्रश्न सुटला आहे. नुकत्याच घोषित केंद्राच्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राकरिता रेल्वे विकास प्रकल्पांना चालना देण्याकरिता ५,९५८ कोटी रुपयांची भरीव आर्थिक तरतुद केली असून आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या इइतिहासातील हा सर्वाधिक महसूल आहे. (शहर प्रतिनिधी) इटारसी- नागपूर- बल्लारशाह तिसऱ्या लाईनसाठीही आर्थिक तरतूदगत वर्षीच्या अर्थसंकल्पात मंजुरीप्राप्त कामांना आर्थिक तरतूद उपलब्ध होवून रेल्वे मंत्र्यांनी इटारसी- नागपूर- सेवाग्राम- बल्लारशा रेल्वे मार्गावरील तिसऱ्या लाईनला मंजुरी प्रदान केली आहे. सेवाग्राम बल्लारशाह या तिसऱ्या लाईनच्या निर्मितीकरिता ६५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. यासोबत चांदाफोर्ट व चंद्रपूर रेल्वे स्थानकही एकमेकांना जोडल्या जाणार असल्याने रेल्वे प्रवाशांकरिता महत्पवूर्ण सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच आदिलाबाद- गडचांदूर रेल्वे लाईनच्या कामास लवकरच प्रारंभ होणार आहे.