लोकमत न्यूज नेटवर्ककन्हाळगाव : महाराष्ट्र तेलंगणा राज्याच्या सीमेवर, कोरपना, तालुक्यातील परसोडा गावानजिक उपाशा नाला येथे राज्य सीमा फलक लावण्यात आला होता. मात्र या सीमा स्वागत फलकाचे लोखंडी रॉड कुजल्याने व वादळामुळे हा फलक मागील वर्षी जून महिन्यात रस्त्यादरम्यान कोसळला. महामार्गावर वाहतुकीला अडथळा होत असल्याने चाकरमान्यांनी हा फलक रस्त्याच्या कडेला बाजूने सारून ठेवला, परंतु याला एक वर्षाचा प्रदीर्घ कालावधी लोटूनही हा फलक आजतागायत रस्त्यालगतच पडला आहे.तेव्हापासून सदर फलक पूर्णत: भंगारात रूपांतरित आहे. मात्र याकडे लक्ष द्यायला सार्वजनिक बांधकाम विभागाला वेळ नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. परंतु रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला मात्र विदर्भ राज्याच्या फलक डौलात उभा असल्याने नव्याने राज्यात दाखल होणाऱ्यांना आपण विदर्भ की महाराष्ट्र राज्यात आहो याबाबत संभ्रम निर्माण होत आहे. तेव्हा येथील जनतेचीही विदर्भ राज्य व्हावे, अशीच मानसिकता झाली असताना महाराष्ट्र राज्य सीमेचाही फलक उभारून रिकामा खर्च करून निधी कशाला दवडायचा असा तर प्रश्न संबंधित अधिकारीही विदर्भातीलच असल्याने त्यांना पडला नसावा ना? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होतो आहे.या सीमा फलकामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना सीमेबाबतची माहिती होत होती. शिवाय या फलकावर प्रमुख शहराचे अंतर नोंदविण्यात वणी मार्ग जात असल्याने यामार्गेसुद्धा नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, वरोरा ही शहरे गाठता येतात. मात्र राजूरा मार्गे हे अंतर दर्शविले असल्याने नागपूर व वाराणसी शहराचे अंतर अधिक दिसून येते. अलिकडे या महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. मात्र ना रस्त्यात बदल किंवा दिमाखदार राज्यसीमेवर फलक नसल्याने राष्ट्रीय महामार्ग म्हणनेही धाडसाचेच ठरते आहे. या मार्गावरुन मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे. या मार्गावरुन हैद्राबाद, नागपूर, नांदेड, लातूर, परभणी, यवतमाळ, रायपूर, भोपाल, छिंदवाडा, लांबपल्याची जडवाहने दररोज धावतात. त्यामुळे नवीन वाहतुकदारही संभ्रमात पडतात. त्यांना रस्त्यावरील नागरिकांकडून मार्गासंबंधी माहिती घ्यावी लागते आहे. विदर्भवाद्यांची उभारलेला फलक दिमाखात उभाविदर्भवाद्यांनी स्वयंस्फूर्तीने उभारलेल्या विदर्भ राज्याच्या फलकातून विदर्भवादी व विदर्भातील जनतेच्या भावना लक्षात येत असल्यातरी या मागणीकडे केंद्रसरकारचे दुर्लक्ष होते आहे. मात्र येथे महाराष्ट्र राज्याच्या सीमा तुटलेल्या स्वागत फलकाकडे खुद्द प्रशासनानेच दुर्लक्ष केल्याने येथील प्रशासनाला पण वेगळा विदर्भच पाहिजे, असे वाटते.
वर्ष लोटूनही महाराष्ट्र सीमेचा फलक रस्त्याच्या कडेलाचफलकाचे भंगारात होतेय रूपांतर : बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष
By admin | Updated: July 9, 2017 00:45 IST