शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

14 हजारांवर रुग्ण कोरोनातून मुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 05:00 IST

आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या १६ हजार ९४७ वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत १४ हजार १६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या दोन हजार ६७० बाधितांवर उपचार सुरू आहे.

ठळक मुद्दे१६१ नवे बाधित : २४ तासात एकही रुग्ण दगावला नाही

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात रविवारी एकही बाधिताचा मृत्यू झाला नाही तर १७३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तसेच १६१ जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या १६ हजार ९४७ वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत १४ हजार १६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.सध्या दोन हजार ६७० बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख २६ हजार ४०४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख सात हजार ९२३ नमुने निगेटिव्ह आले आहे.जिल्ह्यात रविवारी एकाही बाधिताचा मृत्यू झालेला नाही. नागरिकांनी बाहेर पडतांना तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा तसेच दैनंदिन कामे करताना सोशल डिस्टन्सिंग पाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.तालुकानिहाय नवे बाधितजिल्ह्यात रविवारी पुढे आलेल्या १६१ बाधितांमध्ये ९० पुरुष व ७१ महिला आहेत. यात चंद्रपूर शहर व परीसरातील ६३, पोंभुर्णा तालुक्यातील एक, बल्लारपूर तालुक्यातील एक, चिमूर तालुक्यातील १६, मुल तालुक्यातील तीन, गोंडपिपरी तालुक्यातील पाच, कोरपना तालुक्यातील सहा, ब्रह्मपुरी तालुक्यातील १५, नागभिड तालुक्यातील नऊ, वरोरा तालुक्यातील १३, भद्रावती तालुक्यातील ११, सिंदेवाही तालुक्यातील सात, राजुरा तालुक्यातील सहा, गडचिरोली चार तर भंडारा येथील एक असे एकूण १६१ बाधित पुढे आले आहे.ग्रामीण भागातील बाधितबल्लारपूर तालुक्यातील दादाभाई नौरोजी वार्ड परिसरातून बाधित पुढे आले आहे.राजुरा तालुक्यातील पेठ वार्ड, पांढरवणी, रमाबाई वार्ड, आर्वी भागातून बाधित पुढे आले आहे. वरोरा तालुक्यातील आजाद वार्ड, गजानन नगर, बामर्डा, पद्मालया नगर, आशीर्वाद लेआउट, विठ्ठल मंदिर वार्ड, इंद्रा नगरी बोर्डा, जामखुला, गाडगे नगर परिसरातून बाधित ठरले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील विद्यानगर, रेणुका माता चौक, देलनवाडी, झाशी राणी चौक, विदर्भ इस्टेट परिसर, पटेल नगर, नान्होरी, कपिल नगर परिसरातून बाधित ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील लोणारा, घोडपेठ, राधाकृष्ण कॉलनी परिसर, सुमठाणा, चंदनखेडा, देऊळवाडा, डिफेन्स चंदा परिसरातून बाधित पुढे आले आहे. सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी, काटवल, देवाडा, रत्नापूर भागातून बाधित पुढे आले आहे. नागभीड तालुक्यातील चिधिंचक, शिवनगर, वसुंधरा कॉलनी परिसर, सुलेझरी, सुंदर नगर, देवतक, प्रगती नगर परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. चिमूर तालुक्यातील वडाळा पैकु, गांधी वार्ड, नेरी, तळोधी, टिळक वार्ड, नेहरू चौक परिसर, मासळ, मोटेगाव भागातून बाधित पुढे आले आहे. मुल तालुक्यातील वार्ड नंबर ६, परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.चंद्रपुरात येथे आढळले नवे बाधितचंद्रपूर शहरातील व परिसरातील भिवापुर वॉर्ड, गोपालपुरी,बालाजी वार्ड, जटपुरा वार्ड, पंचशील चौक परिसर, पडोली, गणेश नगर तुकूम, भानापेठ वार्ड, जगन्नाथ बाबा नगर, खुटाळा, वृंदावन नगर, नगीना बाग, वडगाव पद्मापूर, धानोरा पिंपरी, श्रीराम चौक, अरविंद नगर, कैलाश नगर नांदगाव, घुगुस, गंजवार्ड, बाबुपेठ, सुभाष नगर, ऊर्जानगर, द्वारका नगर, सौगात नगर, एकोरी वार्ड भागातून बाधित पुढे आले आहे.