शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कमल क्लबतर्फे चिनी वस्तूंवर बहिष्कार आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 23:32 IST

दिवाळी सणाच्या निमित्ताने चंद्रपूर बाजारपेठमध्ये चिनी उत्पादीत वस्तूंच्या खरेदीवर बहिष्कार घालण्यासाठी व चिनी वस्तूंची विक्री करणाºया प्रवृत्तीचा निषेध नोंदविण्याकरिता चंद्रपूरातील कमल स्पोर्र्टिंंग क्लबच्या वतीने....

ठळक मुद्देचिनी वस्तूंचा निषेध : स्वदेशी मालाचा स्वीकार करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दिवाळी सणाच्या निमित्ताने चंद्रपूर बाजारपेठमध्ये चिनी उत्पादीत वस्तूंच्या खरेदीवर बहिष्कार घालण्यासाठी व चिनी वस्तूंची विक्री करणाºया प्रवृत्तीचा निषेध नोंदविण्याकरिता चंद्रपूरातील कमल स्पोर्र्टिंंग क्लबच्या वतीने बहिष्कार व निषेध आंदोलन शनिवारी सायंकाळी करण्यात आले.स्थानिक गांधी चौक येथे सायं ६.०० वाजता शेकडो युवकांनी चीनविरूध्द नारे देत चिनी उत्पादनास बाजारपेठेतून हद्दपार करा, खरेदीवर बहिष्कार घालून स्वदेशी वस्तूंची खरेदी करा, देशाच्या अर्थव्यवस्थेला हानी पोहचविण्यास कारणीभूत ठरलेल्या चिनी वस्तूंचा वापर नागरिकांनी टाळावा व भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करून देशाला संपन्न राष्ट्र म्हणून घडविण्यात योगदान द्यावे, असे आवाहन कमल स्पोर्टिंग क्लबच्या वतीने सदर आंदोलनातून करण्यात आले.यावेळी कमल स्पोर्टिंग क्लबचे अध्यक्ष रघूवीर अहीर यांनी चीननिर्मित वस्तंूवर बहिष्कार घालण्याचे कारण याबाबत सविस्तर विवेचन आपल्या मार्गदर्शनातून केले. भारतीय बाजारपेठेत चीन उत्पादित वस्तूंच्या आक्रमणाने भारताच्या अर्थव्यवस्थेवर फार मोठा परिणाम झाल्याचे सांगत राष्ट्राच्या आर्थिक प्रगतीला मारक ठरलेल्या चिनी वस्तूंवर बहिष्कार हेच खºया राष्ट्रभक्तीचे द्योतक ठरेल, असे प्रतिपादन केले.या प्रसंगी उपाध्यक्ष सुरज पेदूलवार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. भारताविरूध्द सदैव कारस्थान करून पाकिस्थानला चेतावनी देतांनाच आर्थिक व संरक्षण विषयक सहकार्य करणाºया चीनला धडा शिकविण्यासाठी चिनी वस्तुंवर बहिष्कार करावे, असे प्रतिपादन केले. यावेळी कृपेश बडकेलवार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी राहुल गायकवाड यांनी चिनी वस्तूची खरेदी करणार नाही,अशी शपथ सर्व उपस्थितांना दिली.यशस्वीतेसाठी कमल स्पोर्टींग क्लबचे मार्गदर्शक मोहन चौधरी, कमल स्पोर्टींग क्लबच्या पदाधिकारी व सदस्यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे संचालन कपिश उजगांवकर तर उपस्थिताचे आभार अभिनव लिंगोजवार यांनी मानले. यावेळी महानगरातील विविध क्षेत्रातील नागरिक, महिला, पुरूष, युवक-युवती आदी उपस्थिती होती.