पोलीस बंदोबस्त : एकमेकाविरुद्घ दिली पोलिसात तक्रारमाजरी : येथे दोन गटांमध्ये हाणामारी झाली. यात तीघेजण जखमी झाले. या घटनेमुळे काही वेळासाठी गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून जमावाला शांत केले. येथील व्यापारी, ग्रामपंचायत सदस्य उल्हास रत्नपारखी तथा मदन चिकवा यांच्यात गुरुवारी सकाळी शाब्दिक वाद झाला. यानंतर दोघांनीही पोलिसात एकमेकाविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर सायंकाळी ६ वाजता पुन्हा दोन गटात हाणामारी झाली. यात उल्हास रत्नपारखी, अमित उर्र्फ द्यानचंद गुलगुंड (३३), गौतम उर्फ गोलू गुलगुंड (३२) जखमी झाले. घटनेनंतर पोलिसांनी गावात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.(वार्ताहर)
माजरीत दोन गटांत हाणामारी
By admin | Updated: January 29, 2015 23:05 IST