चंद्रपूर : कोरोना महामारीमुळे चंद्रपूर महापालिका क्षेत्रामध्ये २०१९ च्या तुलनेमध्ये मृत्यूदर वाढला असून जन्मदरातही घट झाली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाने संभाव्य संकट लक्षात घेता अनेकांनी पाळणा लांबविला आहे. विशेष म्हणजे, लाॅकडाऊनच्या विविध निर्बंधांमुळे विवाहाचे प्रमाणही कमी झाले आहे.
कोरोना प्रादुर्भावामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचा फटका प्रत्येक क्षेत्राला बसला आहे. दरम्यान, २०१९ या वर्षाची तुलना केली तर कोरोना प्रादुर्भावामुळे २०२० तसेच २०२१ मध्ये मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. चंद्रपूर महापालिका क्षेत्रामध्ये २०१९ मध्ये जानेवारी ते डिसेंबर या महिन्यांमध्ये ३ हजार ८९२ एकूण मृत्यू झाले होते, तर २०२० मध्ये ५ हजार ४०८ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.
यासोबतच जन्मदरातही घट झाली आहे. २०१९ मध्ये जानेवारी ते डिसेंबर या कालावधीमध्ये ७ हजार ४८६ मुले तर ७ हजार १४६ मुली अशा एकूण १४ हजार ६३२ जणांच्या जन्माची नोंद महापालिकेकडे आहे,
तर २०२० मध्ये जानेवारी ते डिसेंबर या कालावधीमध्ये ६ हजार ९५४ मुले तर ६ हजार ५७ मुली असा एकूण १३ हजार ११ जणांचा जन्म झाला आहे. यामध्ये २०१९ च्या तुलनेमध्ये २०२० मध्ये १ हजार ६२१ ने ही संख्या घटली आहे.
बाॅक्स
लग्नांची संख्या घटली
कोरोना संकटाने तोंड वर काढल्यानंतर विवाह होण्याचेही प्रमाण घटले आहे. काहींनी लग्नकार्य आटोपले असले तरी आजही काहीजण कोरोना संकट गेल्यानंतरच विवाह करण्याच्या बेतात आहे. विशेष म्हणजे, काही कुटुंबीयांनी तर विवाहासाठी मंगल कार्यालय तसेच इतर सर्व तयारी केली असतानाही यावर्षी लग्नकार्य रद्द केले आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षभराचा विचार केल्यास विवाह नोंदणीचेही प्रमाण घटले आहे.
बाॅक्क्
मागील दीड वर्षापासून कोरोना संकट घोंघावत आहे. अनेकांना बाधाही झाली आहे. या संकटामुळे एकूणच जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे बहुतांश नवदाम्पत्यांनी या संकटामध्ये पाळणा न हलविण्याचा निर्णय घेतला आहे.
बाॅक्स
वर्ष जन्म मृत्यू
२०१९ १४६३२ ३८९२
२०२० १३०११ ५४०८
मुले मुलींच्या जन्माचे प्रमाण
२०१९
मुले- ७४८६
मुली- ७१४६
२०२०
मुले ६९५४
मुली ६०५७