शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूचा प्रकोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 06:00 IST

चंद्रपूर जिल्ह्याला अस्मानी संकटांनी त्रासून सोडले आहे. जिल्ह्यात जवळजवळ सर्वच शेतकरी अवेळी झालेल्या पावसामुळे वैतागले आहे. संपूर्ण पिके डोळ्यादेखत उद्ध्वस्त झाले आहे. अशातच आता साथीच्या आजारानेही जिल्हावासीयांना नाकीनऊ आणले आहे. मागील दीड महिन्यांपासून व्हायरल फिवरने हजारो नागरिक खाटेवर खिळून होते. त्यानंतर आता डेंग्यूने तापाने नागरिकांची झोप उडविली आहे.

ठळक मुद्देयंत्रणा झोेपेत : महिनाभरात डेंग्यूचे २३७ रुग्ण आढळले

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा सध्या ओला दुष्काळ आणि तापाच्या विळख्यात सापडला आहे. व्हायरल फिवर, टाईफाईड, डायरियाने जिल्ह्यात थैमान घातले असतानाच आता डेग्यूनेही जिल्ह्याला आपल्या कवेत घेतल्याचे शासकीय आकडेवारीवरून दिसते. मागील महिनाभरात जिल्हा सामान्य रुग्णालयात तब्बल २३७ डेंग्यूच्या रुग्णांची नोंद झाली आहे. केवळ शासकीय रुग्णालयाचे हे आकडे आहेत. चंद्रपुरातील अनेक खासगी रुग्णालयातही सध्या डेंग्यूच्या आजाराचे रुग्ण भरती असल्याची माहिती आहे.चंद्रपूर जिल्ह्याला अस्मानी संकटांनी त्रासून सोडले आहे. जिल्ह्यात जवळजवळ सर्वच शेतकरी अवेळी झालेल्या पावसामुळे वैतागले आहे. संपूर्ण पिके डोळ्यादेखत उद्ध्वस्त झाले आहे. अशातच आता साथीच्या आजारानेही जिल्हावासीयांना नाकीनऊ आणले आहे. मागील दीड महिन्यांपासून व्हायरल फिवरने हजारो नागरिक खाटेवर खिळून होते. त्यानंतर आता डेंग्यूने तापाने नागरिकांची झोप उडविली आहे. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात मागील महिनाभरात तब्बल २३७ डेंग्यूचे रुग्ण दाखल झाले. डेंग्यूच्या रुग्णांची ही धक्कादायक आकडेवारी केवळ एकट्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील आहे. चंद्रपुरातील अनेक खासगी रुग्णालयातही सध्या शेकडो डेंग्यूचे रुग्ण उपचार घेत आहेत. अनेक गंभीर डेंग्यू रुग्णांना नागपूरलाही रेफर केल्याची माहिती खासगी रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर लोकमतशी बोलताना दिली. एवढ्या मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण जिल्ह्यात असताना आरोग्य यंत्रणा अद्याप गंभीर झाल्याचे दिसत नाही. जिल्ह्यात सुरू असलेला डेग्यूचा हा प्रकोप आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणेने पुढाकार घेण्याची नितांत गरज आहे.महिनाभरात ७२३ व्हायरल फिवरच्या रुग्णांची नोंदमागील दीड महिन्यांपासून जिल्ह्यात व्हायरल फिवरने चांगलेच थैमान घातले होते. वातावरणातील वारंवार होत असलेल्या बदलामुळे अशी स्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात महिनाभरात ७२३ व्हायरल फिवरच्या रुग्णांची नोंद झाली. खासगी दवाखान्यात तर याहून चौपट व्हायरल फिवरच्या रुग्णांनी मागील महिनाभरात उपचार करवून घेतला. यासोबतच जिल्ह्यातील काही भागात डायरियाने अनेकजण बाधित झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. सामान्य रुग्णालयात २७३ डायरियाचा रुग्ण दाखल करण्यात आले होते.डेंग्यूची अशी असतात लक्षणेडेंग्यू तापाची लक्षणे ही इतर विषाणूजन्य गंभीर तापाच्या लक्षणांसारखीच असतात. उदा. अचानक चढणारा ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी व डोळयांच्यामागे दुखणे. रक्तस्त्रावित डेंग्यू ताप हा डेंग्यू तापाची गंभीर अवस्था आहे. याची सुरुवात तीव्र तापाने होते व त्याच्यासोबत डोकेदुखी, भूक मंदावणे, मळमळणे व पोटदुखी ही लक्षणे असतात. सुरुवातीच्या काही दिवसात याची लक्षणे साध्या डेंग्यू तापासारखी असतात व क्वचित त्वचेवर पुरळ दिसून येतात. रक्तस्त्रावित डेंग्यू तापाचे निदान अंगावरील दर्शनिय भागावर (हातपाय, चेहरा व मान) यावर आलेल्या पुरळांवरुन केली जाते. नाकातून, हिरडयातून व गुदद्वारातून रक्तस्त्राव अशीही लक्षणे आढळतात.

टॅग्स :dengueडेंग्यू