खरीप हंगामामध्ये प्रथम पाऊस नव्हता. त्यानंतर आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान यावर्षी पिकांना भावसुद्धा व्यवस्थित मिळाला नसल्याने तसेच काही शेतकऱ्यांना विकलेल्या मालाचे पैसेही मिळाले नसल्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आर्त. दरम्यान, डिझेलचे दर झपाट्याने वाढल्यामुळे शेतीची यांत्रिक मशागतही खर्चाची झाली आहे. सध्या खरीप हंगाम संपला आहे. तर रबी हंगामही संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकरी सध्या शेतीच्या मशागतीची कामे करीत आहेत. मात्र, सर्वच कामांचे दर वाढले आहेत. विशेष म्हणजे, सध्या डिझेलचे दर ८५ ते ८६ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. विशेष म्हणजे, बैलजोडीची किंमत वाढल्यामुळे शेतकरी यांत्रिकी शेतीकडे वळले आहेत. मात्र, यातही त्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेती करायची कशी, असा प्रश्न सध्या त्यांना पडला आहे.
--
कोट
डिझेलचे दर वाढल्यामुळे ट्रॅक्टर चालविणे कठीण झाले आहे. डिझेल वाढल्यामुळे ट्रॅक्टरद्वारे शेतीच्या मशागतीमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. वखरणी, नागरणीचे एकरामागे काही प्रत्येक गावामध्ये कमी जास्त प्रमाणात दर वाढले आहेत.
-संदीप वनकर
चंद्रपूर
---
बैलजोडीच्या किमती वाढल्या आहेत. आता बैल ठेवणे शेतकऱ्यांना परवडण्यासारखे नाही. खर्च अधिक आणि नफा कमी, अशी शेतीची अवस्था झाली आहे. आता डिझेलचे दर वाढल्याने त्याचाही परिणाम शेतीवर पडला आहे.
-सतीश चहारे
चंद्रपूर
-