शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

३३९ प्रस्तावांपैकी केवळ निम्मे प्रस्तावच मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 05:00 IST

शेतीची कामे करताना विविध प्रकारचे अपघात व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू होत असतो. अशा मय्यत शेतकऱ्यांच्या कुटुंबाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अंमलात आणली. या योजनेतंर्गत सन २०१६-२०२० या चार वर्षात जिल्हाभरातून एकूण ३३९ प्रस्ताव कृषी विभागाकडे प्राप्त झाले. यापैकी १४३ प्रस्ताव मंजूर करण्यात आले. विविध त्रुटींमुळे ५९ प्रस्ताव नामंजूर करण्यात आले.

ठळक मुद्देगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा : योजना ठरतेय शेतकऱ्यांसाठी मृगजळ

परिमल डोहणे ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शेतीची कामे करताना शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी सुरु केलेले गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतील जाचक अटींमुळे शेतकऱ्यांसाठी मृगजळ ठरत आहे. मागील चार वर्षात या योजनेसाठी ३३९ प्रस्ताव पाठविण्यात आले. मात्र त्यापैकी केवळ १४३ प्रस्तावांना मंजूरी मिळाली आहे. तर ५९ प्रस्ताव नामंजूर करण्यात आले आहे.शेतीची कामे करताना विविध प्रकारचे अपघात व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू होत असतो. अशा मय्यत शेतकऱ्यांच्या कुटुंबाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अंमलात आणली. या योजनेतंर्गत सन २०१६-२०२० या चार वर्षात जिल्हाभरातून एकूण ३३९ प्रस्ताव कृषी विभागाकडे प्राप्त झाले. यापैकी १४३ प्रस्ताव मंजूर करण्यात आले. विविध त्रुटींमुळे ५९ प्रस्ताव नामंजूर करण्यात आले. सद्य: स्थितीत चार वर्षाचे मिळून त्रुटी पुर्ततेकरिता ७३ प्रस्ताव प्रलंबित असून ६४ प्रस्ताव प्रक्रियेमध्ये आहेत.शेतात काम करताना अपघात झाल्यास अथवा नैसर्गिक आपत्तीने जखमी किंवा मृत्यू झाल्यास संबंधितांना नुकसानभरपाई म्हणून आर्थिक लाभ दिला जातो. या लाभासाठी शेतकरी किंवा वारसदाराने विम्याच्या कालावधीत तलाठ्यांच्या प्रमाणपत्रासह तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे पाठविला जातो. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी या प्रस्तावाची नोंद घेऊ न शासनाने विमा सल्लागार असलेल्या विभागीय कार्यालयाकडे हे प्रस्ताव पाठवतात.विमा सल्लागार कार्यालयाकडून प्राथमिक छाननी करुन प्रस्ताव विमा कंपनीकडे अंतिम मंजुरीसाठी सादर केले जातात. पात्र प्रस्तावाला विमा कंपनीकडून मंजुरी देऊन संबंधितांना आर्थिक लाभ मिळतो. मात्र जाचक अटींमुळे अनेकजण वंचित राहत असल्याचे वास्तव आहे.अशी मिळते मदतगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास वारसदारास दोन लाख रूपये नुकसान भरपाई मिळते. अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकाली झाल्यास दोन लाख रूपये, अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकाली झाल्यास दोन लाख रूपये तसेच अपघातामुळे जखमी झाल्यास सबंधित शेतकºयाला एक लाख रूपये नुकसान भरपाई दिली जाते.यांना मिळतो योजनेचा लाभपाण्यात बुडून मृत्यू होणे, जंतुनाशके हातळताना किंवा इतर कारणाने झालेली विषबाधा विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून शेतकऱ्यांचा मृत्यू होणे, हत्या, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश, विंचू दंश, रस्ता, रेल्वे अपघात, जनावरांच्या हल्ल्यात जखमी अथवा मृत्यू आदी प्रकारच्या बाबींसाठी मृतक शेतकऱ्यांचे वारसदार तसेच जखमी शेतकऱ्यांला विमा दिला जातो.योजनेसाठी आवश्यक कागपदत्रगोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रस्तावासोबत सादर करणे गरजेचे आहे. लाभार्थी शेतकऱ्याच्या नावाचा समावेश असलेला सातबारा किंवा आठ अ नमून्यातील उतारा, ज्या नोंदीवरून अपघातग्रस्त शेतकऱ्याचे नाव सातबारावर आले असेल, अशी संबंधित फेरफार नोंद, शेतकऱ्यांचे वारसदार म्हणून तलाठ्याकडील गाव नमूना क्र. ६ ची नोंद, अपघाताच्या स्वरूपानुसार विहीत केलेली दस्तावेज सादर करणे गरजेचे आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती