शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सुभाषचंद्र बोस यांच्या फाईल्स नष्ट करण्यासाठी दिले होते आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 11:43 IST

इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान असताना त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची महत्त्वाची कागदपत्रे असलेल्या ४०० फाईल्स नष्ट करण्याचे आदेश दिल्याचा आरोप आझाद हिंद सेनेचे संस्थापक प्रमुख नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्रकुमार बोस यांनी येथे गुरुवारी पत्रकाराशी बोलताना केला.

ठळक मुद्देचंद्रकुमार बोस यांचा आरोप चौकशीसाठी एसआयआटी गठित करण्याची केली मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान असताना त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची महत्त्वाची कागदपत्रे असलेल्या ४०० फाईल्स नष्ट करण्याचे आदेश दिले होते. इतकेच नव्हे, चार मंत्र्यांना त्यांच्या विभागाची कामे सोडून या फाईल्सचा अभ्यास करून त्यातील महत्त्वाची कागदपत्रे नष्ट करण्यात आल्याचा गंभीर आरोप आझाद हिंद सेनेचे संस्थापक प्रमुख नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्रकुमार बोस यांनी येथे गुरुवारी पत्रकाराशी बोलताना केला. केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांच्या विनंतीवरून एका कार्यक्रमासाठी चंद्रकुमार बोस चंद्रपुरात आले होते.सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू विमान अपघातात झाला नाही. ज्या तारखेला नेताजींचा मृत्यू दाखविलेला आहे. त्या दिवसापूर्वी एक महिना आणि नंतरचा एक महिना या काळात कोणत्याही विमानाने घटनास्थळ दाखविलेल्या ठिकाणाहून उड्डाण घेतले नसल्याचे पुरावे आहेत. मात्र विद्यमान स्थितीत नेताजी जिवंत नसावे, कारण आजघडीला त्यांचे वय १२२ वर्षे आहे. इतकी वर्षे कुणीही जिवंत राहू शकत नाही, असेही ते म्हणाले. नेताजींच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी स्पेशल इन्व्हेस्टीगेटींग टीम (एसआयटी) गठित करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र यांच्याकडे केली आहे. एसआयटीच्या माध्यमातून जपान, सोव्हिएत रशिया व इंग्लंडमध्ये जावून चौकशी करावी लागेल. तेथे असलेल्या कागदपत्रांवरून सत्य पुढे येण्याची शक्यताही त्यांनी यावेळी वर्तविली. प्रतंप्रधान मोदी यांनी एसआटी गठित करण्याच्या दिशेने सकारात्मक पाऊल उचलल्याची माहितीही चंद्रकुमार बोस यांनी यावेळी दिली.नेताजी सुभाषचंद्र बोस हे अखंड भारताचे पहिले पंतप्रधान होते. २१ आॅक्टोबर १९४३ रोजी आझाद हिंद सरकारची स्थापना केली होती. या घटनेला आता ७५ वर्षे झाली आहे. मात्र त्यांना ७५ वर्षांत सन्मान मिळालेला नाही. ही इतिहास दाबून ठेवण्यात आला होता. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्त्वातील सरकार हा इतिहास बाहेर काढण्याचे काम करीत आहे. दिल्लीच्या लालकिल्ल्यावर तिरंगा फडकाविण्याची इच्छा नेजाती बाळगून होते. त्यानंतरच भारताला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळेल, अशी त्यांची भावना होती. नेताजींची ही इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ आॅक्टोबर २०१८ रोजी लालकिल्ल्यावर तिरंगा झेंडा फडकावून पूर्ण केली, याकडेही चंद्रकुमार बोस यांनी लक्ष वेधले.नेताजींच्या आझाद हिंंद सेनेत ६० हजार सौनिक होते. पैकी २६ हजार सैनिकांनी देशासाठी बलिदान दिले. हा इतिहासही गडप केला आहे. मात्र त्यांच्या सैन्यातील काही सैनिक आजही जिवंत आहे. येत्या २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राजपथावर पथसंचलनात सहभागी करून त्यांना सन्मान दिला जाणार आहे. ७५ वर्षांनंतर मोदींच्या नेतृत्त्वातील सरकारकडून नेताजींना सन्मान मिळत असल्याचेही चंद्रकुमार बोस म्हणाले.

टॅग्स :Netaji Subhashchandra Boseनेताजी सुभाषचंद्र बोस