शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
4
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
5
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
6
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
7
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
8
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
9
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
10
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
11
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
12
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
13
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
14
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
15
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
16
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
17
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
18
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
19
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
20
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला कडाडून विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 23:31 IST

बायपास मार्गावरील कम्पोस्ट डेपोमध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करण्याकरिता आलेली निविदा मंजूर करण्याला स्थायी समितीच्या सभेत कडाडून विरोध करण्यात आला.

ठळक मुद्देस्थायी समितीची सभा : वाढीव विकास आराखड्याला स्थगिती

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : बायपास मार्गावरील कम्पोस्ट डेपोमध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करण्याकरिता आलेली निविदा मंजूर करण्याला स्थायी समितीच्या सभेत कडाडून विरोध करण्यात आला. त्यानंतर वाढीव शहर विकास आराखड्याबाबतही सकारात्मक चर्चा होऊ शकली नाही. त्यामुळे हा विषयही स्थगित करण्यात आला.महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा गुरुवारी आयोजित करण्यात आली. सभापती राहुल पावडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत दोन विषयावरून चांगलाच गदारोळ झाला. सभा सुरू होताच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी कंत्राट देण्याचा विषय चर्चेसाठी ठेवण्यात आला. येथील बायपास मार्गावर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करण्यासाठी मनपाने निविदा काढल्या होत्या. हैदराबाद येथील एका कंपनीने निविदा भरली होती. या कंपनीला कंत्राट द्यावे काय, याबाबत सभेत चर्चा झाली.मात्र याला समितीच्या सदस्यांनी कडाडून विरोध केला. ८०० रुपये प्रति टन याप्रमाणे ही कंत्राटी कंपनी घनकचºयावर प्रक्रिया करून खत वा इतर वस्तू तयार करणार आहे. मात्र ८०० रुपये प्रति टन म्हणजे नागरिकांच्या पैशाची लूट असल्याचे सदस्यांनी सांगितले. अनेक ठिकाणी २५० ते २८० रुपये प्रति टन, याप्रमाणे कंत्राटी कंपन्या कम्पोस्ट डेपोवर खत निर्मिती प्रकल्प राबवित आहेत. ते यात यशस्वीही झाले आहेत.हैदराबाद येथील कंपनीला प्रति टन कचºयाचे ८०० रुपये देणे हा पैशाचा अपव्यय आहे. त्यामुळे हे कंत्राट मंजूर करू नये, अशी मागणी सदस्यांनी केली. त्यानंतर या विषयाला स्थगिती देण्यात आली.दरम्यान, वाढीव शहर विकास आराखडा तयार करण्याचा विषयही चर्चेसाठी ठेवण्यात आला. या आराखड्यासाठी दोन कोटी ९७ लाख ९७ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र या विषयालाही सदस्यांनी विरोध दर्शविला. अद्याप महापालिका हद्दीत वाढीव क्षेत्र समाविष्ट झालेले नाही. प्रस्तावित गावांच्या ग्रामसभांना मनपा हद्दीत समाविष्ट होण्यास नकार दर्शविला आहे. असे असताना आताच आराखडा तयार करणे व निधी खर्च करणे उपयुक्त नाही, असे सदस्यांचे म्हणणे होते. त्यामुळे या विषयालाही स्थगिती देण्यात आली.आठ सदस्य निवृत्तमनपाच्या स्थायी समितीत १६ सदस्य आहेत. यापैकी आठ सदस्यांची मुदत संपल्याने त्यांना या सभेत ईश्वर चिठ्ठीद्वारे निवृत्त करण्यात आले. यात विद्यमान सभापती राहुल पावडे यांच्यासह वंदना जांभुळकर, सचिन भोयर, राजेंद्र अडपेवार, सोपान वायकर, ज्योती गेडाम, छबू वैरागडे आणि अशोक नागापुरे यांचा समावेश आहे. या सदस्यांच्या जागेवर दुसºया आठ सदस्यांची निवड १ एप्रिलनंतर होणाºया आमसभेत केली जाणार आहे. जोपर्यंत सभापती पदाची निवडणूक होणार नाही, तोपर्यंत राहुल पावडे हेच स्थायी समितीचे अध्यक्ष असतील.