शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महानगर पालिकेसमोर तेली समाजबांधवांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:27 IST

श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी महोत्सव रॅलीच्या निमित्ताने तेली समाजाच्या वतीने शनिवारी शहरात काही ठिकाणी बॅनर लावले होते.

ठळक मुद्देहोर्डिंग्ज हटविण्यात दुजाभाव : आयुक्तांनी समाजाची माफी मागावी

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी महोत्सव रॅलीच्या निमित्ताने तेली समाजाच्या वतीने शनिवारी शहरात काही ठिकाणी बॅनर लावले होते. मात्र न्यायालयाचे आदेश असल्याचे सांगत पालिकेने बॅनर काढून टाकले. परंतु, गुजरात राज्याच्या निवडणुकीत भाजपला बहुमत येताच अनेक ठिकाणी विनापरवानगीने बॅनर लागले. हे बॅनर हटविण्यात मनपाकडून दुजाभाव होत असल्याने बुधवारी तेली समाजबांधव मनपावर धडकले. आयुक्तांनी समाजाची माफी मागावी, अशी मागणी करीत मनपाच्या कारभाराचा निषेध करण्यात आला.चंद्रपूर महानगरपालिकेने न्यायालयाच्या आदेशानुसार शहरात होर्डींग्ज लावण्यावर बंदी घातली आहे. जागोजागी होर्डींग्ज लागत असल्यामुळे शहराचे विद्रुपिकरण होते, असे मनपाचे म्हणणे आहे. हा कायदा सर्वांसाठी सारखा असला पाहिजे. परंतु, न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून व महानगर पालिकेच्या आशीर्वादाने विशिष्ट समाजाचे व सत्तेत असलेल्या पक्षाचे होर्डींग्ज वेळोवेळी शहरात लागत आहे. हे बॅनर हटविण्याकडे मनपाचे दुर्लक्ष होत आहे, असे तेली समाजाच्या पदाधिकाºयांचे म्हणणे आहे.२० डिसेंबरला जटपुरा गेटजवळ भाजपाने गुजरात विजयाचे मनपाच्या विनापरवानगीने होर्डींग्ज व बॅनर्स लावले. या बॅनर्सजवळ तेली समाज बांधवांनी तीव्र निदर्शने केली. त्यानंतर मनपावर धडक देत मनपाच्या कारभाराचा निषेध केला. त्यानंतर उपायुक्त देवळीकर यांच्याशी चर्चा करून भाजपाचे बॅनर्स काढण्यास लावले. बॅनर काढून भावना दुखावल्याप्रकरणी आठ दिवसात मनपा आयुक्ताने तेली समाज बांधवांची माफी मागावी, अन्यथा समाजबांधव रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे.यावेळी माजी नगरसेवक आकाश साखरकर, दीपक बेले, राजेंद्र रघाताटे, सुधाकर लोखंडे, राजेश बेले, प्रवीण चवरे, आशिष मेहरकुरे, शेखर हजारे, गोलु तेलमाखे, अनुप बेले, पप्पु लोनकर, नितेश जुमडे यांच्यासह असंख्य समाजबांधव उपस्थित होते.सत्ताधाऱ्यांचे बॅनर का हटवत नाही : जोरगेवारचंद्रपूर : तेली समाजाचे आराध्य दैवत संत श्री शिरोमणी जगनाडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरात विविध ठिकाणी बॅनर लावण्याची परवानगी तेली समाजातर्फे मागण्यात आली होती. शहराचे विद्रूपिकरण होते, असे कारण देत बॅनर लावण्यास मनपाने नकार दिला होता. त्यानंतरही लावलेले बॅनर मनपाने काढले. मात्र सत्ताधारी राजकीय पक्षाचे बॅनर शहरात ठिकठिकाणी लावले जात आहेत. हे मनपातील अतिकर्तव्यदक्ष अधिकारी आणि पदाधिकाºयांना दिसत नाही का? बॅनर लावण्यासाठी रितसर परवानगी मागुनही ती नाकारली. मात्र सत्ताधाऱ्यांचे बॅनर्स लावले जातात. यामुळे शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडत आहे का? असा प्रश्न करीत शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख किशोर जोरगेवार यांनी मनपाच्या धोरणाचा निषेध केला आहे.