शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
2
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
3
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
4
चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली
5
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
6
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...
7
Rambabu Singh : अवघ्या ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेले जवान रामबाबू सिंह शहीद; पत्नीला अजून सांगितलंच नाही...
8
१० तारखेला वाढदिवस साजरा केला अन् दुसऱ्याच दिवशी...; आईसह २ मुलांचा दुर्दैवी अंत
9
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
10
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
11
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
12
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?
13
"वाढलेल्या वजनामुळे मला.."; 'हास्यजत्रा' फेम ईशाने केला मोठा खुलासा, झालेला हा आजार
14
Operation Sindoor : काहींचे हात तुटले, तर काहींना गंभीर दुखापत झाली, असीम मुनीर यांनी पाकिस्तानी सैनिकांची अवस्था दाखवली
15
म्युच्युअल फंड की FD.. गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला? फक्त परतावा पाहू नका, 'हे' समजून घ्या
16
लग्नात नायट्रोजनचा धूर ठरला घातक; नवरा-नवरीच्या एन्ट्रीदरम्यान ७ वर्षांच्या मुलीचा गेला जीव
17
भारतीय सैन्याच्या रिटायर्ड कॅप्टनची घरात घुसून हत्या; सरपंचाने मध्यरात्री केला हल्ला
18
High Alert: दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
19
आधी वरमाला घातली अन्..; अभिनेत्याचा बायकोसोबत खास डान्स, रत्नागिरीत गावकऱ्यांच्या साथीने धरला ठेका
20
IPL च्या सामन्यांतून BCCI ची कमाई किती होते, उत्पन्नाचे स्त्रोत काय, कुठून येतो पैसा?

काँग्रेससह विरोधी नगरसेवकांना महापालिकेत येण्यास मज्जाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2021 05:00 IST

गटनेता निवडण्यासाठी भाजप व मित्र पक्षातील नगरसेवकांच्या स्टॅम्पवर स्वाक्षऱ्याही घेण्यात आल्या. परिणामी, विरोधकांऐवजी भाजपातील अतंर्गत वाद राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला. अशातच मंगळवारी ऑनलाईन आमसभेदरम्यान महापौर व आयुक्तांनी मनपाच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावल्याने महापौर व आयुक्तांच्या मनमानी कारभाराचा अतिरेक झाल्याचा आरोप काँग्रेसच्या नगरसेवकांनी केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : स्थायी समितीमधून निवृत्त झाल्यानंतरही कंत्राटदारांची देयके मंजूर करण्यासाठी बेकायदेशीर सभा बोलविण्याचा माजी सभापतींचा प्रयत्न सोमवारी अंगलट आला असतानाच मनपातील भाजप सत्ताधाऱ्यांनी नवाच विक्रम प्रस्थापित केला. विरोधी पक्षातील निमंत्रितांनी सभेत प्रत्यक्षात उपस्थितच राहू नये, यासाठी थेट पोलिसांच्या मदतीने आतून कुलूप लावल्याचा आरोप काँग्रेससह विरोधी नगरसेवकांनी मंगळवारी आंदोलनादरम्यान केला.चंद्रपूर मनपाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप आणि काँग्रेससह विरोधी नगरसेवकांमधील वाद उफाळू लागला आहे. गत आठवड्यात स्थायी समितीचे सभापती रवी आसवानी यांच्यासह आठ सदस्यांचा कालावधी संपला. या जागेवर सभापतींसह अन्य सात सदस्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. भाजपचे मनपातील गटनेते वसंता देशमुख यांना सभापतीपदासाठी डावलल्यापासून पक्षातच धुमश्चक्री सुरू आहे. संभाव्य सभापतीचे नाव गटनेत्यांनाच पाठविण्याचा सर्वस्वी अधिकार आहे. मात्र, स्थायी समितीच्या सभापतीची निवडणूक होण्यापूर्वीच भाजपच्या शिर्षस्थ नेत्यांनी देशमुख यांना गटनेते पदावरून हटविण्याचा निर्णय घेतला. गटनेता निवडण्यासाठी भाजप व मित्र पक्षातील नगरसेवकांच्या स्टॅम्पवर स्वाक्षऱ्याही घेण्यात आल्या. परिणामी, विरोधकांऐवजी भाजपातील अतंर्गत वाद राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला. अशातच मंगळवारी ऑनलाईन आमसभेदरम्यान महापौर व आयुक्तांनी मनपाच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावल्याने महापौर व आयुक्तांच्या मनमानी कारभाराचा अतिरेक झाल्याचा आरोप काँग्रेसच्या नगरसेवकांनी केला आहे.

कुणालाही रोखले नाही - महापौर राखी कंचर्लावारकोविडच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन सभा घेतल्या जात आहेत. उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सर्व पक्षाचे गटनेते, विरोधी पक्षनेते व सभागृह नेते यांना आमसभेत प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची मुभा आहे. प्रवेशद्वाराला कुलूप लावून रोखण्याचा प्रश्नच येत नाही, असा दावा महापौर राखी कंचर्लावार यांनी केला आहे.

मनपात नेमके काय घडले?मंगळवारी दुपारी १ वाजता आमसभा आयोजित केल्याची नोटीस सर्व पक्षाचे गटनेते तसेच विरोधी पक्षनेते व सभागृह नेते यांना देण्यात आली होती. काँग्रेससह विरोधी पक्षाचे नगरसेवक मनपासमोर गेले असता प्रवेशद्वाराला कुलूप ठोकल्याचे दिसून आले. शिवाय, मनपासमोर पोलीसही तैनात होते, असा आरोप काँग्रेसच्या नगरसेवकांनी केला आहे.

नर्सिंग होम्सच्या नुतनीकरणाला १० वर्षांची मुदतवाढशहरातील खासगी, नर्सिंग होम्सला नोंदणी व नुतनीकरण करण्यासाठी १० वर्षांची मुदतवाढ देण्याचा ठराव मंजूर केला. गांधी चौक पटांगण, सातमजली इमारत परिसर, महात्मा गांधी शाळेची जागा व ग्रेन मार्केट इत्यादी ठिकाणी कंत्राटी पद्धतीने पे-पार्कींग सुरू करण्याचा ठरावावरही शिक्कामोर्तब झाले.

महापौर व आयुक्तांविरूद्ध पोलिसात तक्रारप्रवेशद्वाराला कुलूप लावल्याप्रकरणी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी महापौर राखी कंचर्लावार व आयुक्त राजेश मोहिते यांच्याविरूद्ध शहर ठाण्यात तक्रार केली. चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी देशमुख यांनी ठाणेदार सुधाकर आंभोरे यांच्याकडे केली आहे.

सत्ताधाऱ्यांविरूद्ध काँग्रेसचे साडेसाती सद्धबुद्धी आंदोलनमनपा प्रवेशद्वाराला कुलूप लावल्याचे पाहून काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौरांविरूद्ध जोरदार घोषणाबाजी करीत शर्ट काढून साडेसाती सद्धबुद्धी आंदोलन केले. महापौर व आयुक्तांनी पोलीस बंदोबस्त लावून आमसभेसाठी आत येऊ दिले नाही, असा आरोप पप्पू देशमुख व अन्य नगरसेवकांनी केला. मनपाचा गैरव्यवहार चव्हाट्यावर आणणारे अनेक फलक लावल्याचेही आंदोलनस्थळी दिसून आले. आंदोलनात काँग्रेसचे गटनेते डॉ. सुरेश महाकुलकर, काँग्रेस कमिटीचे माजी शहर अध्यक्ष नंदू नागरकर, पप्पू देशमुख, अ. भा. काँग्रेस कमिटी सदस्य सुनीता लोढीया, देवेंद्र बेले, अशोक नागापुरे, अमजद अली, नीलेश खोब्रागडे, संगीता भोयर, ललिता रेवलीवर, कलामती यादव, शालिनी भगत, हरिश कोत्तावार, अरविंद मडावी, स्वाती त्रिवेदी, सागर वानखेडे, अनिता चापले, निखिल धनवलकर, सौरभ ठाेंबरे, राजेंंद्र अवघडे, कुमार स्वामी पोचलवार व कार्यकर्ते सहभागी झाले.

 

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा