शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

ओपनस्पेस बनले हागणदारीचे मुख्यालय

By admin | Updated: February 7, 2015 23:22 IST

संपूर्ण स्वच्छता अभियान किंवा स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून शासनाने हागणदारीमुक्त महाराष्ट्राचा संकल्प बाळगला असला तरी गडचांदुरात आजही अनेक मोकळे भुखंड

गडचांदूर: संपूर्ण स्वच्छता अभियान किंवा स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून शासनाने हागणदारीमुक्त महाराष्ट्राचा संकल्प बाळगला असला तरी गडचांदुरात आजही अनेक मोकळे भुखंड हागणदारीचे केंद्र बनले आहे. त्यामुळे प्रौढांना खुल्या वातावरणात फिरण्यासाठी किंवा छोट्या मुलांना खेळण्यासाठी एकही मोकळी जागा उरली नाही. गडचांदूरात पाच ते सहा मोकळ भुखंड आहेत. याठिकाणी आजपर्यंत ग्रामपंचायत असताना कोणत्याही प्रकारचे सौंदर्यीकरण करण्यात आले नाही. नगर परिषद प्रशासनसुद्धा कोणताही पुढाकार घेत असल्याचे दिसत नाही. एरवी नागरिक प्लॉट विकत घेताना ओपनस्पेसलगतच्या प्लॉटची मागणी करतात. मात्र गडचांदुरात अगदी याउलट चित्र आहे. कोणीही अशा ओपनस्पेसजवळ राहणे पसंत करीत नाही. कारण गडचांदुरातील निम्म्या ओपनस्पेसवर हागणदारीच आहे. सुरुवातीलाच विकसीत ले-आऊट न टाकल्यामुळे ओपनस्पेसची अशी दुरावस्था झाली आहे. कोणत्याही प्रकारचे सौंदर्याकरण करण्यात आलेले नाही.प्रभाग दोनमधील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे नाव असलेल्या वॉर्डात दाटवस्तीच्या मध्यभागी मोठे ओपनस्पेस आहे. या ओपनस्पेसमुळे येथील नागरिकांना दुर्गंधी व शौचास बसणाऱ्यांचा फार त्रास आहे. त्यांना कुणी टोकल्यास त्याचे परिणाम फार वाईट येत असल्याचे अनुभव येथील नागरिक सांगतात. या ओपनस्पेसला पूर्णपणे हागणदारी बनविले आहे.शासनाकडून शौचालय बांधण्याकरिता कर्ज मिळते. मात्र त्याचा लाभ घेण्याची इच्छा लोकांमध्ये दिसत नाही. नगरपालिकासुद्धा त्यासंदर्भात लोकांमध्ये जनजागृती करण्यात अपयशी ठरली आहे. इतर गोष्टींवर अवाढव्य खर्च करणारे लोक शौचालय बांधण्याकरिता मात्र हयगय करताना दिसतात. प्रभाग दोनमधील ओपनस्पेसनवर बाहेरील वॉर्डातील महिला येऊन उघड्यावर शौचास बसतात. एवढेच नाही तर इथे इतरत्र मृत जनावरेसुद्धा आणून टाकली जातात. त्यामुळे या परिसरात सतत दुर्गंधीचे वातावरण असते.पावसाळ्यात तर विविध ओपनस्पेसवर विदारक परिस्थिती असते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वॉर्डातील नागरिकांनी ओपनस्पेसचा विकास करण्याच्या दृष्टीकोनातून वारंवार निवेदने दिली. परंतु यावर नगरपरिषदेकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.संपूर्ण ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राज्यात हागणदारी मुक्त शहर अभियान राबविण्यात येत आहे. या चळवळीच्या यशस्वीतेसाठी अनेक नगर परिषदांनी स्वच्छतेचे काम हाती घेतले असताना गडचांदूरमध्ये मात्र या चळवळीला खीळ बसत आहे. ईच्छाशक्ती असणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांची गडचांदुरात कमतरता आहे. स्थानिक पातळीवर असलेले राजकीय मतभेद, वैयक्तिक मतभेद व अन्य कारणांमुळे तालुक्यातील एकमेव नगरपरिषद व क्रमांक एकची लोकसंख्या असलेले गडचांदूर शहर हागणदारी मुक्त अभियानापासून कोसो दूर आहे. ओपनस्पेसचा योग्य उपयोग नगरपरिषदेने करायला पाहिजे. मात्र ग्रामपंचायतीने योग्य धोरण न आखल्यामुळे अनेक ओपनस्पेस गोदरीमय झाले आहे. (शहर प्रतिनिधी)