शहरं
Join us  
Trending Stories
1
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामन, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
2
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
3
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
4
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
5
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
6
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
7
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
8
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
9
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
10
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
11
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम
12
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
13
या वर्षीच्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा, अमेरिकेच्या 2 तर जपानच्या एका संशोधकाचा संयुक्त सन्मान
14
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
15
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
16
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
17
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
18
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
19
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
20
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न

अरेरे, रूग्णालयाच्या शवगारात प्रेत सडताहेत !

By admin | Updated: November 6, 2014 22:51 IST

दुरवस्था आणि अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाअभावी नेहमीच चर्चेत राहणाऱ्या येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात आता संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या रूग्णालयाच्या शवगारात असलेले प्रेत

अशी कशी ही अवहेलना ! : बॉडी फ्रिजर १५ दिवसांपासून बंदचंद्रपूर : दुरवस्था आणि अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाअभावी नेहमीच चर्चेत राहणाऱ्या येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात आता संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या रूग्णालयाच्या शवगारात असलेले प्रेत ठेवण्याचे फ्रिजर गेल्या पंधरा दिवसांपासून बंद आहे. परिणामत: आलेले प्रेत दुसरीकडे ठेवण्याची व्यवस्था नसल्याने चक्क प्रेत सडण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शवांची ही अवहेलना गेल्या पंधरा दिवसांपासून सुरु असली तरी, यावर जिल्हा सामान्य रूग्णालयाला अद्यापही उपाय मात्र सापडलेला नाही, हे आश्चर्यच आहे.येथील जिल्हा सामान्य रूग्णालयातील शवविच्छेदनगृहात असलेल्या फ्रिजरमध्ये एकाच वेळी १० मृतदेह ठेवण्याची व्यवस्था आहे. यात, एका कप्प्यात तीन प्रेत मावतील असे दोन कप्प्यांचे एक आणि एकाच कप्प्प्यात एक प्रेत मावेल अशा चार कप्प्यांचा समावेश असलेले अन्य फ्रिजर आहे. मात्र त्यातील सहा प्रेत ठेवण्याचे फ्रिजर गेल्या पंधरा दिवसांपासून बंद आहे. तर दुसरेही नादुरुस्त आहे. ते ठोकल्याशिवाय सुरूच होत नाही. बरेचदा आपोआप बंद पडून जाते.बेवारस आढळलेले अथवा ओळख न पटू शकणारे मृतदेहच या ठिकाणी ओळख पटेपर्यंत ठेवले जातात. किंबहुना शवविच्छेदनासाठी विलंब होत असल्यास काही तासांसाठी या ठिकाणी प्रेत ठेवण्यात येतात. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून फ्रिज बंद असल्याने शवांची अवहेलना सुरू आहे. गेल्या आठवड्यात चंद्रपुरातील एका युवकाचे प्रेत स्मशानभूमीत बेवारस आढळले होते. ते याच फ्रिजरमध्ये ठेवण्यात आले. तीन दिवसांनी नातेवाईकांनी येऊन प्रेताची ओळख पटविली. मात्र प्रेताची अवस्था पाहण्यापलिकडची होती. नातेवाईकांच्या मते प्रेत ताब्यात घेण्याच्या अवस्थेतही नव्हते. तरीही त्यांनी ताब्यात घेऊन धार्मिक सोपस्कार पार पाडले. असाच प्रकार याच आठवड्यात अन्य पे्रतांसदर्भातही घडला आहे. नातेवाईकांना प्रेत ताब्यात घेण्याशिवाय गत्यंतर नसते. या ठिकाणचे फ्रिजर बंद पडण्याचे कारण मेंटनन्स नसणे असे सांगितले जात आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या दुरूस्ती व देखभालीसाठी जो निधी येतो, तोच यासह अन्य कामांवरही खर्च केला जातो. एकदा फ्रिज बंद पडला की स्थानिक स्तरावर तो दुरूस्त करण्याची सोय नाही. पुण्यावरून तंत्रज्ज्ञ येईल तेव्हाच तो दुरूस्त होतो. तोपर्यंत आहे त्याच स्थितीत काम चालवून घ्यावे लागते. नातेवाईक आधीच दु:खात असतात. बरेचदा नातेवाईकांची तक्रारीची मानसिकता नसते. त्यामुळे हा प्रकार आजवर उघड झालाच नाही. मात्र प्रेतांची विटंबना सुरु आहेच. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील पंधरा दिवसांपूर्वीच या ठिकाणचे फ्रिजर युनिट सुरु करण्यात आले होते. मात्र त्यातील एक युनिट फक्त एक दिवस चालला. दुसऱ्या दिवशी पुन्हा बंद पडला. तंत्रज्ज्ञ पुण्याला असल्याने तातडीने येण्याची व्यवस्था नाही. स्थानिक स्तरावर दुरूस्तीचे अधिकारही नाहीत. त्यामुळे आता पुण्यावरून मेकॅनिक येईपर्यंत वाट पहाण्याशिवाय गत्यंतर नाही. जिल्हा सामान्य रूग्णालयात सध्या समस्यांचा डोंगर आहे. तत्कालिन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद सोनुने यांच्या काळात तर समस्यांनी कळसच गाठला होता. नवे अधिकारी डॉ. मुरंबीकर १ नोव्हेंबरपासून रुजू झाले आहेत. त्यांच्या काळात बदलाची अपेक्षा आहे. (जिल्हा प्रतिनिधी)