लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात आजपासून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांचे कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले. सध्या सुमारे अडीच हजार डोस शिल्लक आहेत. शासनाकडून डोस उपलब्ध झाले नाही तर गुरूवारी बरेच केंद्र बंद ठेवण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर येऊ शकते.कोरोना प्रतिबंधासाठी ६० वर्षे तसेच ४५ वर्षांवरील सहव्याधी व्यक्तींना लस घेताना अडचणी येऊ नये, याकरिता जिल्ह्यात ९१ केंद्र सुरू आहेत. यातील ७० शासकीय व ६ खासगी आहेत. जिल्हा आरोग्य प्रशासनाकडे सध्या कोविशिल्ड लसीचे सुमारे अडीच हजार डोस उपलब्ध आहेत. पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी कोव्हिशिल्ड’ लस पाठविण्यात आली. दुसऱ्या टप्प्यातील मागणीनुसार, कोव्हॅक्सिन’लसीचे ४ हजार ८०० डोस जिल्ह्याला मिळाले. ३१ मार्चपर्यंत ही लस २३६ जणांना टोचण्यात आली. ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यात हेल्थ केअर वर्कर, फ्रन्ट लाईन, ६० वर्षांवरील व सहव्याधी असणाऱ्या ४५ वर्षांवरील एक लाख १० हजार १७२ जणांनी लस घेतली. सर्व वयोगटातील पात्र नागरिकांच्या संख्येनुसार जिल्ह्याला १४ लाख ८० हजार डोसेसची आवश्यकता आहे.
एक लाख १७ हजार डोसेसची मागणीनागरिकांच्या लसीकरणासाठी केंद्रांची संख्या वाढविण्यात आली. मात्र, मात्र, पुरेसा लससाठा उपलब्ध नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने एक लाख १७ हजार डोसेची मागणी शासनाकडे नोंदविली आहे.
११ हजार ३४ जणांनी घेतली लसकोणती व्याधी नसणाºया ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांचे आजपासून लसीकरण सुरू झाले. आरोग्य विभागाने रात्री ८ वाजता दिलेल्या माहितीनुसार ११ हजार ३४ जणांनी लस घेतली. बºयाच नागरिकांनी संकेतस्थळावर नोंदणी केली आहे. परंतु, पुरेशा डोसेसअभावी वेटींगवर राहावे लागणार आहे.