पोलीस व महागरपरिषदने कारवाई केली तर दुकाने उचलतात. मात्र, दुसऱ्या दिवशी पुन्हा फुटपाथवर येतात. प्रस्तावित हॉकर्स झोनचा दिवस मागील अनेक वर्षांपासून उजाडला नाही. महानगरपालिकेने रस्त्यावरील फुटपाथवर विक्रेत्यांची नोंदणी करून हॉकर्स झोन केला नाही. त्यामुळे पादचाऱ्यांना जीव धोक्यात घालून चालावे लागते तर रस्त्यावर दुकाने लावली नाही तर ग्राहक कुठून येणार, असा विक्रेत्यांचा सवाल आहे. मनपाने बऱ्याच विक्रेत्यांना ओळखपत्र दिले. शिवाय, विविध योजनांद्वारे अनुदान दिले. काहींनी बँकांतून कर्ज काढले. त्यामुळे फुटपाथ हाच त्यांचा आधार झाला आहे.
कोविड १९ संसर्गाचा धोका
कोविड १९ संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी मास्क लावावे, दुकानदारांनी ग्राहकांसाठी सॅनिटाईजर ठेवावे, अशा सूचना दिल्या आहेत. मात्र, ग्राहक याकडे लक्ष देत नाहीत. मास्क लावणाऱ्यांची संख्या तर कमालीची कमी झाली आहे. त्यामुळे फुटपाथ दुकाने कोरोना संसर्गाला कारणीभूत ठरू शकतात.
वस्तू स्वस्त मिळतात म्हणून उसळते गर्दी
चंद्रपूर शहरात कोरोना रूग्णांची संख्या आता कमी झाली आहे. लॉकडाऊनमुळे मोठ्या दुकानदारांंचे नुकसान झाले. आता दुकाने सुरू झाल्याने काही वस्तुंच्या किमती वाढविल्या. त्यामुळे रस्त्यावरील फुटपाथ दुकानातून वस्तू स्वस्त मिळतात म्हणून ग्राहकांचीही गर्दी दिसून येत आहे. रविवारी मुख्य रस्ता गजबजलेला असतो.
महानगरपालिकेने हॉकर्स झोन तयार केला नाही. मोठे व्यापारी आपल्या दुकानातून व्यवसाय करतात. कोरोनामुळे आधीचा रोजगार बंद झाला. त्यामुळे कुटुंब चालविण्यासाठी चप्पल विक्री सुरू केली. हक्काचा हॉकर्स झोन तयार झाला तर रस्त्यावर दुकान लावण्याची गरज नाही.
-प्रल्हाद रामटेके, फुटपाथ व्यावसायिक, चंद्रपूर