शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यात यंदा धानाचे एकरी उत्पन्न केवळ पाच पोती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 11:34 IST

यंदा पावसाने दगा दिला. त्यानंतर विविध रोगांनी धानपिकांवर आक्रमण केल्याने अर्धेअधिक धान पीक नष्ट झाले. त्यामुळे एकरी चार ते पाच पोते धान पीक शेतकऱ्यांच्या हाती आले.

ठळक मुद्देउत्पादनात प्रचंड घट धानाला तीन हजार रूपये हमीभावाची मागणी

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : यंदा पावसाने दगा दिला. त्यानंतर विविध रोगांनी धानपिकांवर आक्रमण केल्याने अर्धेअधिक धान पीक नष्ट झाले. त्यामुळे एकरी चार ते पाच पोते धान पीक शेतकऱ्यांच्या हाती आले. यावर्षी धान उत्पादनात प्रचंड घट आली असून एकरी १५ हजार रूपये खर्च करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातात पाच हजाराचे उत्पन्न आल्याने शेतकरी कमालीचा हादरला आहे.बल्लारपूर तालुक्यात मानोरा कवडजई, किन्ही, कोेर्टी, पळसगाव, आमडी, कळमना, दहेली, बामणी, आसेगाव, गिलबिली, मोहाडी तुकूम, इटोली व कोठारीसह अनेक गावात हजारो हेक्टरवर धानपिक घेतल्या जाते. या भागात धान पीक प्रमुख असून मागील काही वर्षांपासून निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे शेतकरी हतबल झाला आहे. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ शेतकऱ्यांच्या जिवारी आला आहे. शेतीसाठी विविध बँका, सहकारी सोसायट्या व सावकारी खाजगी कर्जाची उचल केल्याने कर्जाचा डोंगर उभा ठाकला आहे. त्यात उत्पन्नात कमालीची घट आल्याने मुलांचे शिक्षण, लग्न आणि कुटुंबाचा उदरनिर्वाहाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. पीक हाती येण्याच्यावेळी भातावर मावा-तुडतुडा, करपा, खोडकिडा, गेवरा आदी रोगाने धानपिकांवर आक्रमण केले व उभे पीक नष्ट झाले. यामुळे शासनाने भरपाई देण्याची मागणी आहे.

हेक्टरी २५ हजार रूपये आर्थिक मदत द्यानिसर्गाच्या लहरीपणामुळे व धानपिकांवर आलेल्या विविध रोगाने त्याचा गंभीर परिणाम उत्पादनावर झाला. अर्ध्यापेक्षा कमी उत्पादन झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे सर्वे करून शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रूपयाची मदत शासनाने जाहीर करण्याची मागणी कोठारीचे सरपंच मोरेश्वर लोहे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

शेतकऱ्यानेच धानपिक जाळलेकोठारीपासून तीन किमी अंतरावर असलेल्या बामणी येथील तरुण शेतकरी शैलेश रामटेके याने जंगली जनावरांच्या त्रासामुळे व धानावर आलेल्या विविध रोगामुळे त्रस्त होवून उभे धानपिक जाळून टाकले आहे.

टॅग्स :agricultureशेती