नामदेव कल्याणकर : सर्वेक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजनसावली : विघातकतेकडे वळणारे युवकांचे हात विधायक कार्याकडे वळल्यास बलशाली देशाची सहज निर्मिती होवू शकते, हा दृष्टिकोन समोर ठेवून राष्ट्रीय सेवा योजनेची निर्मिती करण्यात आली आहे. या माध्यमातून युवकांमध्ये उत्साह व श्रमप्रतिष्ठा वाढीस लावून व्यक्तिमत्व विकासाची सुवर्ण संधी मिळत असते, असे मत गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नामदेव कल्याणकर यांनी व्यक्त केले.राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय, सावलीच्या वतीने व टाटा ट्रस्ट यांच्या सहकार्याने सावली येथे आयोजित स्वच्छतेकरीता युवक व सर्व्हेक्षण प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव राजाबाळ पाटील संगीडवार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. उद्घाटन कार्यक्रमास विद्यापीठाचे रासेयोचे कार्यक्रम समन्वयक डॉ. ईश्वर मोहुर्ले, मधुकर कोतपल्लीवार, सुखदेवे, सुधाकर गाडेवार, प्राचार्य मिराताई शेंडे आणि मुख्याध्यापक अर्जूनकर उपस्थित होते. संचालन दिलीप सोनटक्के यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)
तरच बलशाली देशाची निर्मिती
By admin | Updated: December 20, 2015 00:52 IST