शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

दहावीतही मुलींचीच बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 00:25 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज शुक्रवारी आॅनलाईन जाहीर करण्यात आला. यात चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ८५.१५ टक्के लागला. नागपूर विभागात निकालात चंद्रपूर जिल्हा सहाव्या क्रमांकावर आहे.

ठळक मुद्देटक्का घसरला : जिल्ह्याचा निकाल ८५.१५ टक्के

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज शुक्रवारी आॅनलाईन जाहीर करण्यात आला. यात चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ८५.१५ टक्के लागला. नागपूर विभागात निकालात चंद्रपूर जिल्हा सहाव्या क्रमांकावर आहे. मागील तीन वर्षांची परंपरा कायम राखत यंदाही दहावीत मुलींनीच बाजी मारली. त्या मुलांच्या तुलनेत अव्वल राहिल्या.चंद्रपूर जिल्ह्यातून एकूण ४६४ शाळांमधून ३१ हजार ९७८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यातील ३१ हजार ८०८ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले. पैकी एकूण २७ हजार ८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यातील तब्बल तीन हजार ८९० विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे. १० हजार ५४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. १० हजार ६३६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत तर दोन हजार ५०९ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. नागपूर विभागात चंद्रपूर जिल्हा निकालात सहाव्या क्रमांकावर आहे. मागील वर्षी जिल्हा निकालात पाचव्या क्रमांकावर होता. त्या तुलनेत यंदा दहावीच्या निकालात जिल्ह्याची टक्केवारी चांगलीच घसरली आहे.मागील वर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी दहावीच्या परीक्षेत आपल्या हुशारीची चुणूक दाखविली. दहावीच्या परीक्षेत एकूण १६ हजार ८०० मुलांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यातील १६ हजार ६८२ मुले परीक्षेला बसली. यातील १३ हजार ७५६ मुले उत्तीर्ण झालीे. उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ८२.४६ आहे.यासोबतच एकूण १५ हजार १७८ मुलींनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यातील १५ हजार १२६ मुलींनी परीक्षा दिली. पैकी १३ हजार ३२८ मुली उत्तीर्ण झाल्या. उत्तीर्ण मुलींची टक्केवारी ८८.११ आहे. यंदाही मुलींनीच बाजी मारली.पुनर्परीक्षार्थ्यांचा निकाल ५१.२७ टक्केदहावीच्या परीक्षेत पुनर्परीक्षार्थ्यांचा (रिपीटर) निकाल ५१.२७ टक्के लागला आहे. एकूण दोन हजार ६१ विद्यार्थ्यांनी परीक्षेकरिता नोंदणी केली. यातील दोन हजार ४४ विद्यार्थी परीक्षेला बसले. पैकी एक हजार ४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ५१.२७ आहे. पुरर्परीक्षार्थ्यांमध्ये चार विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले आहे. ५५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे तर ९३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.५० शाळांचा निकाल शंभर टक्केयंदा जिल्ह्याच्या निकालाची टक्क़ेवारी घसरली असली तरी शाळांचा निकाल मात्र चांगला लागला आहे. जिल्ह्यातील तब्बल ५० शाळांनी शंभर टक्के निकाल दिला आहे.

टॅग्स :SSC Results 2018दहावी निकाल २०१८