शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
3
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
4
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
5
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
6
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
7
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
8
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
9
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
10
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
11
धक्कादायक! ब्रेकअपमुळे पाचवीतील ४ मुलींनी रचला वर्गातील मुलाच्या हत्येचा कट
12
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
13
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
14
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
15
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
16
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
17
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
20
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना

ऑनलाईन परवानगी ठरली मुलाच्या लग्नात अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 05:00 IST

लग्नाचा मुहुर्त येईपर्यंत गाड्या घोड्यांची ऑनलाईन परवानगी मिळत नसल्याने कुटुंबीयातीलच लोकांना स्वत:ची समजूत काढून घरी राहण्यातच धन्यता मानावी लागत आहे. वडीलांचे नुकतेच निधन झाल्याने आपल्या लग्न कार्यात जन्मदात्या आईची तरी उपस्थिती राहावी, या अपेक्षेने परवानगीसाठी ऑनलाईन केलेले प्रयत्न निष्फळ ठरले. त्यामुळे बुधवारी एकट्या नवरदेव मुलाला वधू मंडपी जावून लग्नकार्य पार पाडावे लागले.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लॉकडाऊनच्या काळात नियोजित लग्न सोहळे केवळ सोपस्कर ठरले असल्याने वर-वधूच्या कुटुंबीयांच्या आनंदावर विरजण पडले आहे. लग्नाचा मुहुर्त येईपर्यंत गाड्या घोड्यांची ऑनलाईन परवानगी मिळत नसल्याने कुटुंबीयातीलच लोकांना स्वत:ची समजूत काढून घरी राहण्यातच धन्यता मानावी लागत आहे. वडीलांचे नुकतेच निधन झाल्याने आपल्या लग्न कार्यात जन्मदात्या आईची तरी उपस्थिती राहावी, या अपेक्षेने परवानगीसाठी ऑनलाईन केलेले प्रयत्न निष्फळ ठरले. त्यामुळे बुधवारी एकट्या नवरदेव मुलाला वधू मंडपी जावून लग्नकार्य पार पाडावे लागले.वर्धा जिल्ह्यातील आगरगाव येथील हरिभाऊ काळे यांच्या आरती नामक मुलीचा लग्नसोहळा बल्लारपूर निवासी रितेश दादाजी खिरवडकर यांच्यासोबत ३ जून रोजी पार पडला. अतिशय साध्या पद्धतीने सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून बंधू मंडपी लग्नाचे सोपस्कार पूर्ण करण्यात आले. आधी हा लग्नसोहळा ३ एप्रिल रोजी नियोजित होता. परंतु कोरोनाच्या संक्रमणातील लॉकडाऊनच्या कडक निर्बंधामुळे हा सोहळा पुढे ढकलण्यात आला. संपूर्ण कुटुबियांना या कार्यात सहभागी होता यावे, यासाठी रितेश खिरवडकर याने परवानगीसाठी प्रयत्न केले. रितेशच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यामुळे आपल्या पोटच्या गोळ्याचे लग्न ‘याची डोळा’ बघणे आईची सर्वोत्तम इच्छा. मात्र आईला व अन्य कुणालाही लग्नसोहळ्यात जाण्याची परवानगी न मिळाल्याने अखरे नवरदेव रितेशला आपल्या एका मित्राला सोबत घेऊन वधुमंडपी पोहचावे लागले. त्यामुळे नवरदेवाच्या आईला या आनंदाच्या क्षणापासून वंचित रहावे लागले.

टॅग्स :marriageलग्नcorona virusकोरोना वायरस बातम्या