चंद्रपूर : कोरोनाच्या संकटामुळे ऑनलाईन अभ्यासक्रमाचा पर्याय समोर आला. अगदी पहिल्या वर्गापासून तर वरच्या वर्गांपर्यंत विद्यार्थी स्मार्ट फोन, आयपॅड, संगणकाचा वापर करीत आहेत. मात्र डोळ्यांची निगा राखण्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे डोळ्यांच्या आजारांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे ऑनलाईन अभ्यास करताना डोळ्यांची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे.
कोरोना संकटामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याला घेऊन पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ऑनलाईन पर्याय समोर आला. मात्र ऑनलाईन अभ्यासक्रमात मोबाईलचा अतिवापर अंगावर येण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. काही पालकांनी तर पदरमोड करून पाल्याच्या हातात स्मार्टफोन दिला. आपला मुलगा अगदी कमी वयामध्ये स्मार्टफोन सहज हाताळतो याचा आनंदही पालकांच्या चेहऱ्यावर दिसतो. मात्र हा आनंद भविष्यासाठी धोकादायक ठरू पाहत आहे. अगदी लहान मुले नंबरचे चष्मे लावून फिरत असल्याचे दिसत आहे. शाळेने ठरवून दिलेल्या वेळेपेक्षाही मुले अधिकवेळ मोबाईलमध्ये गुंतलेले आहेत. त्यामुळे झोप कमी होत असून मुलांच्या स्वभावात चिडचिडपणा येत आहे. त्यामुळे आवश्यक असेल तेव्हाच मोबाईल, लॅपटॉपचा वापर करणे गरजेचे आहे.
--
पहिली ती बारावीची विद्यार्थी संख्या
मुले
मुली
बाॅक्स
ऑनलाईन शिक्षणाचे होणारे धोके
विद्यार्थी तासन् तास मोबाईल बघतात. अंधारामध्येही मोबाईल पाहण्याचे प्रमाण अधिक आहे. सतत स्क्रीन बघितल्यामुळे मुलांमध्ये डोळ्याचे दोष निर्माण होण्याची शक्यता आहे. स्क्रीनवरील प्रकाशामुळे, किरणांमुळे डोळ्यांवर परिणाम होतो. इतकेच नाही तर झोप आणि जीवनाच्या इतर चक्रावरही त्याचा दुष्परिणाम होत आहे.
अशी घ्या काळजी
सतत स्क्रीनवर काम करताना डोळ्यांना थकवा येतो. अशावेळी १५ ते २० मिनिटांनी डोळ्यांनी विश्रांती घ्यावी. डोळ्यांना सतत चालू-बंद करावे, थकवा आल्यास स्क्रीनकडे न बघता दूरवरील एखाद्या वस्तूकडे बघावे. दूरपर्यंत नजर जाईल, अशा रीतीने बघितल्यास डोळ्यांना विश्रांती मिळेल. एखाद्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यात सतत पाणी येत असेल, दिसत नसेल, डोळ्यांना कोरडेपणा वाटत असेल तर तात्काळ डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.
कोट
प्रत्येकांच्या डोळ्यांना नैसर्गिक प्रोटेक्शन आहे. त्यामुळे मोबाईल, लॅपटाॅपमध्ये आवश्यकेनुसार ब्राईटनेस ठेवावा. डोळ्यांना थोड्या-थोड्या अंतराने चालू बंद करावे. पंधरा-वीस मिनिटे सतत स्क्रीनवर काम केल्यानंतर दूरवर बघण्याचा प्रयत्न करावा. काही क्षणासाठी डोळ्यांना मिटून डोळ्यांना आराम द्यावा.
-डाॅ. चेतन खुटेमाटे
नेत्ररोग तज्ज्ञ, चंद्रपूर.
इतर कामात मुलांना गुंतविण्याचा प्रयत्न
सर्वच विद्यार्थी ऑनलाईन अभ्यास करीत असल्यामुळे मुलांना मोबाईल देणे आवश्यक झाले आहे. मात्र मुले शाळेच्या अभ्यासाव्यतिरिक्त मोबाईल बघत आहेत. यावर आळा घालण्यासाठी मुलांना इतर कामामध्ये गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
- रोहित ठाकुर
पालक, चंद्रपूर.