शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

गाव पहाल एका गल्लीचे, कारभार म्हणाल तर दोन ग्रामपंचायतींचा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 16:02 IST

चिमूर तालुक्यातील खुर्सापार सुमारे दोनशे ते अडीचसे लोकवस्तीचे एकाच गल्लीचे गाव आहे. वाहानगाव व बोथली या दोन ग्रामपंचायतींमधून खुर्सापार गावचा कारभार चालतो. गावच्या विकासात ही बाब फायद्याची कमी आणि अडचणीची अधिक ठरते आहे.

ठळक मुद्दे विकास मात्र खुंटलाखुसार्पार गावाची अजब कहाणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दोन किंवा त्यापेक्षा अधिक गावे, वाड्या-वस्त्यांंची मिळून गटग्रामपंचायत असते. त्यामार्फत कारभार चालतो, अशी अनेक उदाहरणे आहेत. पण केवळ एकच गल्ली असलेल्या गावचा कारभार चक्क दोन ग्रामपंचायतींमधून चालतो, हे मात्र दूर्मिळच. चिमूर तालुक्यातील खुर्सापार सुमारे दोनशे ते अडीचसे लोकवस्तीचे एकाच गल्लीचे गाव आहे. वाहानगाव व बोथली या दोन ग्रामपंचायतींमधून खुर्सापार गावचा कारभार चालतो. गावच्या विकासात ही बाब फायद्याची कमी आणि अडचणीची अधिक ठरते आहे. त्यामुळे दोन्ही घरचा पाहुणा उपाशी, अशीच काही अवस्था खुर्सापारची झाली आहे.चिमूर-वरोरा मार्गावरील वाहानगाव आणि बोथली ही दोन गावे असून या दोन्ही महसूल गावांच्या दोन किमी आतमध्ये खुर्सापार गाव आहे. गाव एकाच गल्लीचे आहे. गल्लीच्या एका बाजूची घरे वाहानगावच्या हद्दीत, तर दुसऱ्या बाजूची घरे बोथलीच्या हद्दीत. दोन्ही गावांची मिळून जुळलेले गाव म्हणजे खुर्सापार असा येथील इतिहास आहे.गावाची लोकसंख्या दोनशेच्या जवळपास असून शंभरावर मतदार आहेत. वाहानगाव व बोथलीपासून जाण्या-येण्यासाठी पक्का रस्ता आहे; मात्र पाणी, दिवाबत्ती, गटारी अशा सुविधांची वानवा आहे. दोन ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट असलेल्या गावाचे जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघ मात्र एकच आहे. ग्रामपंचायत दोन असल्यामुळे दोन्ही बाजूंनी निधी आणून विकासकामे राबवणे सोपे आहे, असेच सर्वांना वाटले; पण प्रत्यक्षात सीमा वाद आडवा येतो. शिवाय येथे मतदारसंख्याही जुजबीच आहे. त्यामुळे दोन्ही ग्रामपंचायती आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत आहेत. परिणामी दोन्ही घरचा पाहुणा उपाशी अशीच विकासाची अवस्था आहे.एकाच गावात शाळेच्या दोन इमारतीवाहानगाव व बोथली अशा दोन ग्रामपंचायतींमध्ये समावेश असलेल्या खुर्सापार गावात जिल्हा परिषदेची पहिली ते चवथीपर्यंत शाळा आहे. शाळेसाठी बोथली ग्रामपंचायत व वाहानगाव ग्रामपंचायतच्या मार्फतीने दोन इमारती बांधल्या आहेत. त्यामध्ये बोथली ग्रामपंचायतने बांधलेली शाळा जीर्ण झाली. त्यामुळे आता वाहानगाव ग्रामपंचायतने बांधलेल्या इमारतीत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.इतर सुविधांसाठी पायपीटशिक्षणासाठी काही विद्यार्थी परगावी गेले आहेत. गावात प्राथमिक शिक्षणाची व्यवस्था आहे. पुढील शिक्षणासाठी मात्र विद्यार्थांना सुमारे पाच किलोमीटरची पायपीट करावी लागते. दळणवळणाची व्यवस्था नसल्याने विद्यार्थी आणि ग्रामस्थांची कामानिमित्त दररोज पायपीट ठरलेलीच. गावात प्राथमिक सुविधाही नाहीत.कोटतीन घरापासून आता ४० घरे झाली आहेत. गावाची लोकसंख्या दोनशेच्या जवळपास. मात्र गावाचा कारभार दोन ग्रामपंचायतींमधून चालतो. त्यामुळे विकास कामे, शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अडचणी निर्माण होतात. त्यामुळे गावाचा समावेश दोनपैकी कोणत्याही एकाच ग्रामपंचायतमध्ये करावा.-बंडू बुचेग्रामस्थ, खुर्सापार

टॅग्स :Governmentसरकार