चंद्रपूर : जिल्ह्यात २४ तासात प्रथमच एकहजार ३३ जणांनी कोरोनावर मात केली. २१ बाधितांचा मृत्यू झाला तर १६१८ नवीन बाधितांची भर पडली.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ५१ हजार ११२ वर पोहोचली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ३५ हजार ७१२ झाली आहे. सध्या १४ हजार ६४६ बाधितांवर उपचार सुरू आहेत. तीन लाख ५३ हजार ७२ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी दोन लाख ९५ हजार ८०७ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ७५४ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ६९६, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली २५, यवतमाळ २२, भंडारा सहा, गोंदिया एक आणि वर्धा एक, नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे. नागरिकांनी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचे पालन करावे, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांनी कोरोनाची लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
असे आहेत मृतक
आज मृत झालेल्यांमध्ये चंद्रपुरातील ४५ व ३९ वर्षीय पुरुष, भिवापूर येथील ६७ वर्षीय महिला, गोपालपुरी येथील ६१ वर्षीय पुरुष, घुग्घुस येथील ६० वर्षीय पुरुष, मूल तालुक्यातील ३८ व ५३ वर्षीय पुरुष, वरोरा तालुक्यातील ५८ व ७८ वर्षीय पुरुष, ४५ वर्षीय महिला, सरदार पटेल वाॅर्ड येथील ६४ वर्षीय महिला, गोंडपिपरी तालुक्यातील ५२ वर्षीय पुरुष, ब्रह्मपुरी येथील ६५ वर्षीय महिला, नागभिड तालुक्यातील ५५ वर्षीय पुरुष, चिमूर तालुक्यातील ४३ वर्षीय महिला ६५ व ७० वर्षीय, सावरगाव येथील ३६ वर्षीय पुरुष, लाखांदूर येथील ६५ वर्षीय महिला, बल्लारपूर येथील ८० वर्षीय पुरुष, भद्रावती येथील ७२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
तालुकानिहाय बाधित
चंद्रपूर मनपा क्षेत्र ५८७
चंद्रपूर १४०
बल्लारपूर १०१
भद्रावती १००
ब्रह्मपुरी १०६
नागभीड ७७
सिंदेवाही १९
मूल ३०
सावली ३२
पोंभूर्णा ३७
गोंडपिपरी १२
राजुरा ३६
चिमूर ५०
वरोरा १७२
कोरपना ८९
जिवती १६
अन्य १४